श्री किर्तेश्वर देवस्थान येथील श्रावण सोमवार निमित्त भव्य किर्तन महोत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न

श्री किर्तेश्वर देवस्थान येथील श्रावण सोमवार निमित्त भव्य किर्तन महोत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न

केत्तूर प्रतिनिधी 
केत्तूर ता करमाळा येथील श्री किर्तेश्वर देवस्थान येथे श्रावण सोमवार निमित्त प्रत्येक सोमवार हरी किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत किर्तन सेवा झाले नंतर फराळ वाटप सायंकाळी हरिपाठ, महाप्रसाद,भजन,शिवलीलामृत ग्रंथ पारायण असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

श्रावण महिन्यात निमित्त श्री किर्तेश्वर देवस्थान येथे हजारो भाविक भक्तांनी भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतला. हभप बळीराम महाराज वायकर पाडळी,हभप परमेश्वर महाराज भिसे अरणगाव,हभप अनिरूध्द महाराज निंबाळकर बिटरगाव, हभप तुकाराम महाराज भारतीबाबा जेकटेवाडी,हभप संतोष महाराज वणवे बिड यांची किर्तन सेवा संपन्न झाली.

हेही वाचा – केम येथील श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मध्ये “आजची स्त्री-अबला नव्हे ,सबला” हा काव्य जागर कार्यक्रम संपन्न

कुंभेज येथे विद्यार्थ्यांनी घेतली आगळीवेगळी प्रतिज्ञा; वाचा सविस्तर

श्री किर्तेश्वर देवस्थान कडे येणाऱ्या भाविक भक्तांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये भव्य शिवमहापुजेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट कडून देण्यात आली.

karmalamadhanews24: