केत्तूर येथे श्री दत्त जन्मोत्सव उत्सव उत्साहात साजरा

*केत्तूर येथे श्री दत्त जन्मोत्सव उत्सव उत्साहात साजरा*

केत्तूर (अभय माने) दिगंबरा… दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात केत्तूर (ता.करमाळा)येथील श्री दत्त मंदिरात भाविकांचे उपस्थितीत श्री दत्त जन्मोत्सव सोहळा सायंकाळी 7.00 वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी फुलांची मुक्त उधळण व फटाक्याच्या सहभागी करण्यात आली.

सकाळपासूनच श्री दत्त मंदिरात अभिषेक सुरू होते.श्री दत्त जन्मोत्सवासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये महिला भाविकांची संख्या मोठी होती. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.महिलांनी पाळणा गाऊन श्री दत्त महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

हेही वाचा – पांडे येथे गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

कुगाव-शिरसोडी पुलाचे काम प्रचंड वेगात चालू….

मंदिरामध्ये सप्ताहानिमित्त रोज विविध महाराजांची किर्तन सेवा झाली तर विविध अन्नदात्यांनी अन्नदानही केले.शेवटच्या दिवशी रविवार (ता.15) रोजी हभप गुरुवर्य रमेश महाराज शिवापुरकर (सोलापूर) यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद देण्यात आला व सप्ताहाची सांगता करण्यात आली.

छायाचित्र : केत्तूर: श्री दत्त जन्मोत्सव निमित्त पाळणा म्हणताना महिला मंडळी

karmalamadhanews24: