श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा

श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा

माढा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील केम येथील श्री उत्तरेश्वर हायस्कूल येथे राष्ट्रीय गणित दिन आणि गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन माननीय मुख्याध्यापक कदम एस.बी सर यांनी केले.

प्रतिमेस पुष्प अर्पण प्रशालेचे पर्यवेक्षक सांगवे बी.व्ही सर, गिते सर,हिरवे सर, पवार सर, पोदार सर यांनी केले.
गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याची माहिती आणि दैनंदिन जीवनात गणित विषयाचे महत्त्व प्रशालेचे सहशिक्षक जी.के जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले तसेच उपस्थितांचे मने जिंकली.

हेही वाचा -श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध छोटा‌ पुढारी घनश्याम दरोडे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

तालुकास्तरीय स्पर्धेत नेरले शाळेच्या हर्षद शिंदेचे धावण्याच्या स्पर्धेत वर्चस्व

प्रशालेतील गणित विभागाचे प्रमुख गिते सर यांनी राष्ट्रीय गणित दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांनी गणित विषयाचा जास्तीत जास्त सराव करावा असे मत मांडले.
राष्ट्रीय गणित दिनाचे सूत्रसंचालन वाघमारे के.एन सर यांनी केले. पवार टि.व्ही सर यांनी सर्वांचे आभार मानले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line