श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुकचे पुणे विभागीय मैदानी स्पर्धेत यश

श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुकचे पुणे विभागीय मैदानी स्पर्धेत यश

माढा प्रतिनिधी – शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे झालेल्या पुणे विभागीय मैदानी स्पर्धेत श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक विद्यालयाने यश संपादन केले.यामध्ये 4*400 मी रिले स्पर्धेत 17 वर्षे मुलींच्या संघाने पुणे विभागीय मैदानी स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले.यामध्ये काजल पवार,साक्षी गोरे,अपूर्वा शेटे, मैथिली थोरात व गौरी निकम यांनी यश मिळवले.

हेही वाचा – महाफीड कंपनीकडून संगम शाळेस रंगरंगोटी व बोलक्या भिंती करण्यासाठी मदतनिधी

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे हे कर्मवीरांनी ओळखले_डॉ.अभय लुणावत

यशस्वी विद्यार्थिनींना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री शब्बीर तांबोळी सर यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दशरथ देशमुख साहेब,स्कूल कमिटी श्री सिताराम (बापू) गायकवाड,श्री कृष्णा (आप्पा) घाडगे,ॲड.श्री नानासाहेब शेंडे (वकीलसाहेब),उपळाई बुद्रुकचे माजी सरपंच श्री मनोहर (आबा) गायकवाड यांच्यासह विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व उपळाई बुद्रुक पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

karmalamadhanews24: