करमाळा

शिवजयंती निमित्त करमाळा शिवसेनेचे वतीने गरजूंना मदत वाटप; तहसीलदार व मान्यवरांची होती उपस्थिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

शिवजयंती निमित्त करमाळा शिवसेनेचे वतीने गरजूंना मदत वाटप; तहसीलदार व मान्यवरांची होती उपस्थिती

करमाळा प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे गरीब व गरजू महिलांना मोफत दोनशे किराणा सामान किटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून करमाळा चे तहसीलदार समीर माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, मुख्याधिकारी विना पवार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख प्रवीण कटारिया तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड, तालुका संघटक संजय शिंदे, उपशहर प्रमुख पंकज परदेशी, उमेश पवार, संजय भालेराव, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, जय महाराष्ट्र पतसंस्थेचे माजी चेअरमन अनिल पाटील, जय महाराष्ट्र मित्र मंडळाचे उपाध्यक्ष लालू भाई कुरेशी, अमोल परदेशी, सुधीर कटारिया,

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील सावंत मनसेचे नाना मोरे संजय घोलप, बाबुराव गायकवाड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गायकवाड, चैतन्य भोगल, बाळासाहेब इंदुरे, दादा मिर्झा, आकाश राक्षे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना तहसीलदार श्री माने यांनी शिवसेनेच्या या कार्याचे कौतुक केले ते पुढे बोलताना म्हणाले की कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे इतर कार्यक्रमांना फाटा देऊन गोरगरीब जनतेला मदत करण्याचे धोरण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अवलंबिले आहे हे कौतुकास्पद आहे.

हेही वाचा- बापरे! कोरोनाने आजवर करमाळा तालुक्यातील घेतले 68 जीव; वाचा करमाळा तालुक्यात आज गुरुवारी किती रुग्ण वाढले.?

करमाळयातील व्यापाऱ्यांसह ‘या’ सर्वांना कोरोना चाचणी अनिवार्य; ‘या’ कालावधीत होणार चाचणी

पोलीस निरीक्षक पाडुळे साहेब म्हणाले की, हे काम फक्त कट्टर शिवसैनिकच करू शकतात. या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. मुख्याधिकारी पवार मॅडम म्हणाल्या या किराणा सामानाच्या कीट मुळे गोरगरीब जनतेला मोठा आधार होईल. शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करते. शेवटी आभार शहर प्रमुख प्रवीण कटारिया यांनी मानले.

litsbros

Comment here