शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या मकाई कारखान्याच्या सर्व संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी होणार बोंबाबोंब आंदोलन; प्रा.झोळ यांनी पाठवले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या मकाई कारखान्याच्या सर्व संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी होणार बोंबाबोंब आंदोलन; प्रा.झोळ यांनी पाठवले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

करमाळा {प्रतिनिधी} मकाईचे ऊसाची थकीत बिले, याशिवाय मकाई सहकारी साखर कारखान्याच्या सर्व संचालक पदाधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा आदि प्रमुख मागण्यासाठी आम्ही येत्या 28 नोव्हेंबर 2023 मंगळवारी रोजी करमाळा तहसील कार्यालय समोर मकाईच्या निषेधार्थ बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याची माहिती प्राध्यापक रामदास झोळ तसेच दशरथराव कांबळे यांनी संयुक्तरित्या एका मागणी निवेदनाद्वारे केली आहे सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना पाठवले आहे.

जिल्हाधिकारी कडे पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की मकाई सहकारी साखर कारखाना यांची सन 2022 /23 मध्ये एक लाख 59 हजार एवढे गाळप झाले आहे त्या गाळप झालेल्या उसाचे बिल तब्बल एक वर्ष उलटूनही अद्यापही कारखान्याने शेतकऱ्यांना दिलेले नाही याबाबत माननीय साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कारखान्यावर आर आर सी ची कारवाई करण्याबाबत आपणास कळवले होते त्यानुसार माननीय साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हाधिकारी सोलापूर प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर कार्यालयाने कारवाई करून थकीत एफ आर पी रकमेचा 26 कोटी रुपये एवढा बोजा संबंधित कारखान्याच्या मालमत्तेवर चढवलेला आहे असे कळते तसेच द्वितीय लेखापरीक्षक वर्ग 1 सहकार विभाग यांनी केलेल्या पडताळणीमध्ये असे लक्षात येते की संबंधित कारखान्यांमध्ये कोणताही प्रकारचे मोलॅसिस बगेस इत्यादी शिल्लक ठेवलेले नाही त्याची संपूर्ण विक्री केलेली आहे व तसेच तयार झालेल्या सर्व साखरेची विक्री केलेली आहे मग साखरेची विक्री करूनही पैसा गेला कुठे फक्त दोन लाख 75 हजार रुपये ची साखर शिल्लक आहे.

संबंधित कारखान्याच्या विविध बँकांमध्ये असलेल्या चालू व सेविंग खात्यामध्ये दोन कोटी सात लाख रुपये शिल्लक आहेत परिणामी कारखान्याला वारंवार मागणी करूनही ही द्वितीय लेखापरीक्षक वर्ग एक सहकार विभाग तहसीलदार करमाळा प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय सोलापूर आधी कार्यालयाने वारंवार मागणी करूनही संबंधित कारखान्याने या शिल्लक असलेल्या दोन कोटी सात लाख रुपये एवढ्या रकमेचा तपशील दिलेला नाही तसेच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची यादी व त्यांनी पुरवठा केलेल्या उसाच्या टनाबाबतचा तपशील ही गुलदस्त्यात आहे असे निवेदनात म्हटले आहे.

विविध बँक खात्यामध्ये शिल्लक असलेले दोन कोटी सात लाख रुपये शिल्लक रक्कम ही शेतकऱ्यांना का वाटली जात नाही तरी या संदर्भात संबंधित शेतकरी संघटना सर्व सभासद शेतकरी यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय सोलापूर तहसीलदार करमाळा यांनी वेळोवेळी कळविले आहे या बिलाच्या संदर्भातच श्री राजेश गायकवाड हे शेतकरी गेली काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसले असता कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी जाऊन लवकरात लवकर म्हणजेच 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत बिल देऊन असे लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले होते.

मात्र तरीदेखील मकाई कारखान्याने कोणतीही दखल घेतली नाही यापूर्वी कित्येक वेळा अशा प्रकारची पत्रे संबंधित कारखाना पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या तारखा द्वारे यापूर्वी सर्व संबंधित प्रशासकीय कार्यालयांना दिलेली असून ही सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावरही बिले जमा झालेली दिसत नाही असे निवेदनात म्हटले आहे
तरी सर्व घटकांच्या सखोल चौकशी करून अशी दिसते की संबंधित कारखान्याचे तत्कालीन संचालक पदाधिकाऱ्यांनी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची घोर फसवणूक केलेली आहे.

तसेच माननीय साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे सोलापूर जिल्हाधिकारी प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय सोलापूर तहसीलदार करमाळा अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे अगर अन्य मार्गाने आदेश वजा सूचना करूनही उपरोक्त कार्यालयाच्या कारवाईला कारखान्याची संचालक पदाधिकारी भीक घालत नसल्याचे लक्षात आले आहे.

आम्ही सर्व शेतकरी बांधव आपणास या लेखी निवेदनाद्वारे विनंती करतो की उसविले जमा करण्यास जबाबदार नसणाऱ्या संबंधित कारखानाच्या सर्व संचालक पदाधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा तथापि तसे न झाल्यास आम्ही येथे 28 नोव्हेंबर 2023 पासून करमाळा तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे दिनांक 20 नोव्हेंबर 2023 च्या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्णयानुसार करमाळा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून जाहीर झालेला आहे खरीप व रब्बी हंगामातील पिकाचे उत्पन्न शेतकऱ्याच्या हाती लागण्याची आशा मावळे आहे शेतकऱ्याकडून सामूहिक व वैयक्तिकरित्या टोकाचे पाऊल उचलण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा गंभीर परिस्थितीची कृपया आपण नोंद घ्यावी.

आपण यात जातीने लक्ष घालून संबंधित कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांची बिले लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा होण्याचे हेतूने कारखान्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे हेतूने आपण पावले उचलावीत अन्यथा आम्ही येथे 28 नोव्हेंबर 2023 रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचे दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ तसेच शेतकरी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दसरथराव कांबळे यांनी संयुक्तरित्या निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.

हेही वाचा – ओ नेते, ग्रामपंचायत लढवली, आता महिन्यात खर्च सादर करा; शासनाचे आदेश, वाचा कुणाला किती होती मर्यादा?

गुळसडी येथे ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन; नागरिकांची पाण्यासाठीची वणवण थांबणार

निवेदनाच्या प्रती अधिक माहितीसाठी माननीय साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे माननीय साखर सहसंचालक साखर कार्यालय सोलापूर माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर माननीय तहसीलदार तहसील कार्यालय करमाळा माननीय पोलीस निरीक्षक करमाळा यांच्याकडे देण्यात आल्या आहेत.

निवेदनावर प्राध्यापक रामदास झोळ, माननीय दशरथराव कांबळे, श्री राजेश गायकवाड, श्री अंगद देवकते, विकास मिरगळ, लालासाहेब काळे, अण्णासाहेब सुपनर, दादासाहेब कोकरे, चंद्रकांत बोराडे, नागनाथ इंगोले, रमेश वाघमोडे सहित दीडशे शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सह्या आहे.

karmalamadhanews24: