करमाळाधार्मिक

करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात नागाला मारले जात नाही, तर होते जिवंत नागांची पूजा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात नागाला मारले जात नाही, तर होते जिवंत नागांची पूजा

जेउर (प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यातील जेऊर पासुन पाच किलोमीटर अंतरावर शेटफळ हे गाव या गावाला नागोबाचे शेटफळ असे संबोधले जाते. या गावात नागोबांचा मुक्तपणे वावर असतो. परंतु या ठिकाणी दिसणाऱ्या नागांना कधीही मारले जात नाही, त्यांची पूजा केली जाते. गावात घरात निघालेल्या नागांना छोट्या काठीवर घेऊन गावाच्या बाहेरील मंदीराजवळील मोकळ्या जागेत सोडले जाते.

नागोबा हे या गावाची अपार श्रद्धा असून येथे नाग हे गावातील एक सदस्य प्रमाणेच असतात. एखाद्या पाळीव प्राण्याला ज्याप्रमाणे जीव लावल्यानंतर तो हिंस्त्र असला तरी त्याच्यापासून कोणताही धोका होत नाही. त्याचप्रमाणे या गावात नागोबाला अभय असल्यामुळे त्याच्याकडूनही गावातील नागरिकांना त्रास होत नाही. या गावातील लहान चोरापासून प्रत्येक जण नागोबाची मनोकामना पूजा करतात यामुळेच या गावाला नागोबाची शेटफळ असे म्हटले जाते

हेही वाचा- ‘पेरलं पण उगवलच नाही’ करमाळा तालुक्यातील शेतकर्यांची व्यथा

नेरले गावात एकाच दिवशी दोन दुःखद घटना

या गावात प्राचीन हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले नागोबाचे भव्य दिव्य असे मोठे मंदिर आहे. समोर मंदिराचा गाभारा व आजूबाजूला दगडी भिंतीची तटबंदी आहे. मंदिराच्या पाठीमागे असणारा पुष्ककर्णी तीर्थकुंड भव्यतेची जाणीव करून देते. या गावात जीवंत नागाची पूजा केली जाते. या वैशिष्ट्यामुळे वर्षभर या गावाला भेट देणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे.

नागपंचमी दिवशी या गावात हमखास नागोबाचे दर्शन लोकांना होते. देव आपल्याला दर्शन देतो, यामुळे गावकऱ्यांना मनापासून खूप समाधान वाटते. नागपंचमी दिवशी निघालेल्या नागोबाला गावातील पटांगणामध्ये ठेवून त्याच्या भोवती गावातील स्त्रिया गोलाकार करून नागपंचमीची गाणी म्हणतात.

त्यामुळे या दिवशी या गावाला नाग दर्शनासाठी अनेक लोक गर्दी करतात. नागोबाने दुधाला स्पर्श केला तर गावातील महिला याला शुभ मानतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागोबाचे शेटफळ येथे साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी केली असल्याचे शेटफळ येथील युवा पत्रकार गजेंद्र पोळ यांनी बोलताना सांगितले.

litsbros

Comment here