शरद पवारांच्या गटातील ‘हे’ दोन आमदार अजित दादांच्या भेटीला!

शरद पवारांच्या गटातील ‘हे’ दोन आमदार अजित दादांच्या भेटीला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांना आव्हान देत अजित पवार यांनी बंड करत आपली वेगळी चूल मांडली. 

बुधवारी शरद पवार आणि अजित पवार यांनी मेळावे घेत शक्तीप्रदर्शन केलं. यात संख्याबळाच्या लढाईत अजित पवार यांनी बाजी मारल्याचं कालच्या आकडेवरुन दिसून आलं. अजित पवार यांच्याकडे आजच्या घडीला 35 आमदार आहेत. 

तर शरद पवार गटाकडे 18 आमदारांचं संख्याबळ आहे. अजित पवार यांनी आपल्या पाठिशी चाळीस आमदार असल्याचा दावा केला आहे. 

दरम्यान, शरद पवार यांनी काल वाय वी चव्हाण इथं घेतलेल्य मेळाव्यात पाच खासदार आणि काही आमदार उपस्थित होते.

 यातले दोन आमदार आज अजित पवारांच्या भेटीला गेले. राजेश टोपे व सुनील भुसारा यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. टोपे आणि भुसारा काल शरद पवार यांच्याबरोबर वाय बी चव्हाण सेंटर इथं उपस्थि होते. 

टोपे आणि भुसारा यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने तेही अजित पवार गटात सहभागी होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line