शंभूराजे जगताप यांच्या तत्परतेने वाचले 32 वर्षीय युवकाचे प्राण!

शंभूराजे जगताप यांच्या तत्परतेने वाचले 32 वर्षीय युवकाचे प्राण

केत्तूर (अभय माने) शंभूराजे जगताप हे आपल्या कुटुंबियासोबत शनिवार (ता.. 20) रोजी अकलुज भागात जात असताना सायंकाळी 6.30 वाजण्याचे प्रवासा दरम्यान अकलूज शहराजवळ अचानक रस्त्यावर वाहनांचे ट्राफिक व बघ्या लोकांची गर्दी दिसली . क्षणाचाही विलंब न लावता शंभूराजे गाडीतून खाली उतरले व रस्त्यावरील गर्दीकडे गेले पाहतो तर काय ! समोर एक यूवक गाडीला कुत्रे आडवे गेल्याने घसरून पडून गंभीर जखमी होवून पडलेला डोक्याला जबर मार बसलेला अन् रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडलेला .

बघ्यांनी खूप गर्दी केलेली पण मदतीसाठी कोणी पुढे आले नव्हते . तेवढ्यात शंभूराजे तेथे पोहोचले अन् कोणताही विचार न करता त्यांनी त्या रक्ताने माखलेल्या युवकाला कवेत घेऊन आपल्या गाडीत टाकले अन् थेट अकलुज मधील राणे हॉस्पीटल मध्ये नेवून अडमिट केले . 24 तास कोमात गेलेला हा यूवक ज्याचं नाव आहे अब्दुल अल्ताफ सय्यद . आता तो कोमातून बाहेर आला असून त्याच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे . तो अत्यंत गरीब कुटुंबातील असून रिक्षा चालकाचा मुलगा आहे .

हेही वाचा – आषाढी एकादशी निमित्त श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथील विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

भरपूर पाऊस पडू दे,शेतकरी सुखी,समाधानी राहू दे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाकडे साकडं! नाशिक जिल्ह्यातील ‘या’ दापत्याला मिळाला शासकीय पूजेचा मान

खरंतर सय्यद कुटुंबांवर वेळ आली होती पण शंभूराजे यांच्या धाडसी कृत्यामुळे व मदतीमुळे ती वेळ टळली आहे . ‘अल्लाह ‘ च्या रूपाने येऊन करमाळ्याचे माजी आमदार राजाभाऊ च्या मुलाने आमच्या अब्दुलचा जीव वाचवला असे अब्दुल चे वडील अल्ताफभई कृतार्थ होवून सांगत आहेत .

karmalamadhanews24: