*शहिदांची स्मृती जपणे ही आपली नैतिक जबाबदारी*: ॲड. बाळासाहेब मुटके
केत्तूर (अभय माने) शहीदांची स्मृती जपने ही नैतिक जबाबदारी असल्याचे मत कुंभेज (ता.करमाळा) येथे शहीद स्मृतीस्थळ भूमीपूजन प्रसंगी अॅड.बाळासाहेब मुटके यांचे प्रतिपादन व्यक्त केले कुंभेजचे सुपुत्र व भारतीय लष्करातील शहीद जवान आप्पासाहेब काटे यांचे नियोजित स्मृतीस्थळाचा भूमीपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी अॅड. मुटके बोलत होते.
याप्रसंगी सैनिक संयटनेचे तालुका अध्यक्ष मेजर अक्रुर शिंदे बागल विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पाटील, विदर्भ कोकण बँक अधिकारी गणेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अनिल कादगे, प्रा.सचिन हवालदार यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांमध्ये, शहीद जवान कुटुंबीय मा.सोनामाता काटे, शहीद पत्नी राणीताई काटे,मेजर मोहन मुटके, मेजर जालिंदर कन्हेरे,महावीर साळुंके, सुभेदार हाके, इंदापूर सै. संघटनेचे मेजर काटे, गोकुळ शिंदे, उपसरपंच संजय तोरमल, मुख्या. हनुमंत पाटील, सैनिक संघटनेचे सचिव सुभेदार बिभिषण कन्हेरे, अनिल कादगे, पै.आण्णासाहेब साळुंके, भारत काटे, हवालदार बाळासाहेब कन्हेरे, आण्णासाहेब भोसले, सुभेदार आदलिंग, सुभेदार माणिक कडाळे,मेजर सुभाष मुटके, मेजर संतोष वीर, अंकुश गायकवाड, दत्तात्रय शिंदे, संभाजी भोसले, निलेश साळुंके, महावीर भोसले, संदीप शिंदे,अगस्ती मुटके, सोपान शिंदे, छगन गायकवाड,
संतोष गजेंद्र शिंदे, इंजी शशीकांत कन्हेरे, बाबासो माळी, आबा काटे, गोरख मुटके, मेजर कादगे, कांतीलाल कादगे, बागल विद्यालयाचे शिक्षक कल्याणराव साळुंके, सिताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव, सैनिक, प्रीतम चौगुले, सैनिक,किरण मोहिते , माजी सैनिक, दादासाहेब कन्हेरे, माजी सैनिक, अंकुश सरडे, माजी सैनिक, बाळासाहेब शिंदे,माजी सैनिक, कुमार कादगे, विनोद कादगे, संतोष घोरपडे,तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते
ते पुढे म्हणाले की, मातृभूमीची सेवा करत असताना जीवाची पर्वा न करता आपला देश हेच आपले कुटूंब मानून प्रत्येक सैनिक सेवा बजावत असतो. अशा परिस्थितीत एक एक सैनिक म्हणजे देशाचे रत्नच होय.एक शहीद झाल्यास त्याचे कुटूंबासह देशाचे अपरिमित नुकसान होते. सैनिकांप्रती सर्णंच्या मनात सद्भावना असते. भावी पिढीला देशसेवेची व राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारा सैनिकच असतो. कुंभेज येथील शहीद जवान आप्पासाहेब काटे यांचे स्मृतीस्थळ भावी पिढीला कायम प्रेरणा देत राहील. देशप्रेमी नागरिक व कुंभेज ग्रामस्थांच्या सहकार्याने सैनिक कल्याणकारी मंडळाचे माध्यमातून लवकरच भव्य स्मृतीस्थळ निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली.
उन्हाळ्यापूर्वीच उजनीत पाण्याचा खडखडाट
यावेळी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष मेजर अक्रूर शिंदे यांनी शहीद काटे यांचे स्मृती स्थळासाठी आर्थिक योगदान देण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले तसेच उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्याणराव साळुंके यांनी केले.