करमाळा बाजार समितीच्या संचालिकापदी मनीषा देवकर यांची निवड

करमाळा बाजार समितीच्या संचालिकापदी मनीषा देवकर यांची निवड

करमाळा प्रतिनिधी – करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महिला सदस्या साधना पवार यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे बाजार समितीच्या महिला राखीव सदस्य पदाची जागा रिक्त होती .सदर रिक्त जागेवर केम येथील सौ मनीषा देवकर यांची निवड करण्याचा निर्णय बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी घेतला.

बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सौ मनीषा बाळासाहेब देवकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले .यावेळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अपर्णा यादव, उपसभापती शैलजा मेहेर ,संचालक शंभूराजे जगताप, नवनाथ झोळ, सागर दौंड ,तात्यासाहेब शिंदे, रामदास गुंडगिरे, बाळासाहेब पवार, कुलदीप पाटील, काशिनाथ काकडे, मनोज पितळे ,परेश दोशी, वालचंद रोडगे ,शिवाजी राखुंडे , जनार्धन नलवडे,महादेव कामटे ,नागनाथ लकडेआदी उपस्थित होते .

हेही वाचा – जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाला ‘लोकराजा शाहू पुरस्कार’ ; इचलकरंजी येथे झाला सन्मान

पांडे येथे गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

निवडीनंतर सौ मनीषा देवकर यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप व सहाय्यक निबंधक अपर्णा यादव यांनी सत्कार केला . तसेच याप्रसंगी येथील सहाय्यक निबंधक अपर्णा यादव यांची बदली कराड येथे जिल्हा उप निबंधक पदी झाले बद्दल त्यांचा शुभेच्छापर सत्कार माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केला .सूत्रसंचालन अशोक नरसाळे यांनी केले तरआभार बाजार समितीचे सचिव विठ्ठल शिरसागर यांनी मानले .

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line