श्री नंदिकेश्वर विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सवाद्य मिरवणूक
माढा प्रतिनिधी – माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक,पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती सवाद्य मिरवणुकीने मोठ्या उत्साहात साजरी झाली.
कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्री कृष्णा घाडगे,ॲड.श्री नानासाहेब शेंडे,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दशरथजी देशमुख साहेब,प्र.पर्यवेक्षक श्री नागेश बोबे सर,उपळाई बुद्रुकचे माजी सरपंच श्री मनोहर गायकवाड व श्री अजिनाथ बेडगे,सेवानिवृत्त शिक्षक श्री शिवाजी लोंढे सर व श्री रामचंद्र माळी सर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’, ‘कर्मवीर अण्णा अमर रहे’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.ग्रामस्थांनी घरासमोर रांगोळी काढून स्वागत केले तसेच पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले.लेझीम पथक,झांज पथक,टिपरी नृत्य,दिंडी नृत्य,फुगडी नृत्य,तू ग दुर्गा तू भवानी पारंपरिक नृत्य या नृत्य अविष्काराने कार्यक्रमाची शोभा वाढविली.
हेही वाचा – फौजीची वर्दी चिकाटीचे प्रतीक :गणेश करे पाटील यांचे गौरवोद्गार
32 वर्षानंतर उपस्थित राहून माजी विद्यार्थ्यांनी अनुभवली आपली शाळा
श्री शब्बीर तांबोळी सर,श्री केशव गायकवाड सर,श्री सुमित काटे सर,सौ.शिल्पा खताळ मॅडम,कु.ऐश्वर्या फडतरे मॅडम,श्री शरद त्रिंबके सर,श्री अविनाश नारनाळे सर,श्री भगवान जाधव सर,श्री मकरंद रिकिबे सर,श्री महेश वेळापुरे सर,श्री बप्पासाहेब यादव सर,श्री अंकुश घोडके सर व इतर सर्व सेवक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.