सातोली येथे उसाचा ट्रॅक्टर शेतातून नेण्यावरून पिता-पुत्राला मारहाण करत खिशातील रक्कम घेतली काढून; करमाळा पोलिसात १० जणांवर गुन्हा दाखल

सातोली येथे उसाचा ट्रॅक्टर शेतातून नेण्यावरून पिता-पुत्राला मारहाण करत खिशातील रक्कम घेतली काढून; करमाळा पोलिसात १० जणांवर गुन्हा दाखल

करमाळा (प्रतिनिधी); ऊसाचा ट्रॅक्टर अडवला म्हणून दहा जणांनी मिळून पिता पुत्रास जबर मारहाण करून खिशातील रक्कम काढून ठार मारण्याची धमकी दिली आहे. शनिवार दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास करमाळा तालुक्यातील सातोली येथे ही घटना घडली आहे.

याबाबत सातोली येथील संतोष दादा उर्फ बिभीषण फरतडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक ९ डिसेंबर २३ रोजी हनुमंत रंगनाथ साळुंखे हा फिर्यादीच्या शेतातून ऊसाचा ट्रॅक्टर घेऊन जात होता. हा ट्रॅक्टर फिर्यादीने अडवला म्हणून हनुमंत याने त्याच्या नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले.

यांपैकी नितिन हनुमंत साळुंखे याने वडील दादा फरतडे यांना दांडक्याने मांडीवर मारुन ढकलून दिले तर योगेश हनुमंत साळुंखे यांनी ऊस तोडणीच्या हत्याराने वडिलांच्या डोक्यात मारून खाली पाडले आणि केबल व गजाने पाठीवर, पायावर, छातीवर मारहाण केली. या दरम्यान सुहास रामचंद्र साळुंखे याने फिर्यादीच्या पॅन्टच्या डाव्या खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले.

यानंतर दत्तात्रय नानासाहेब साळुंखे, नानासाहेब रंगनाथ साळुंखे, विश्वंभर सोपान साळुंखे, वैभव विष्णू तळेकर, अण्णाभाऊ पवार, विष्णू निवृत्ती तळेकर या सर्वांनी फिर्यादी व त्याचे वडिलांना हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

हेही वाचा – लेखक जगदीश ओहोळ यांनी घेतली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची भेट; ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक दिले भेट

श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मध्ये डॉ.बापूजी साळुंखे वनराई ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन 101 देशी वृक्षांची लागवड करून विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी घेतली वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी

याबाबत करमाळा पोलिसांनी वरील दहा आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२७, ३२४, ३२३, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line