आरोग्यकरमाळा

मौजे सरपडोह येथे डोळे तपासणी शिबीर संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मौजे सरपडोह येथे डोळे तपासणी शिबीर संपन्न

करमाळा (प्रतिनिधी): ओम आय केअर & ऑप्टिकल्स टेंभुर्णी तसेच श्री टेके आय क्लिनिक सांगली व सरपडोह ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज मौजे सरपडोह येथे डोळे तपासणी शिबीर, अल्प दरात चष्मे वाटप व मोफत ऑपरेशन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन गावचे सरपंच प्रतिनिधी श्री पांडुरंग वाळके, सोसायटी चेअरमन श्री लक्ष्मण खराडे यांच्या हस्ते करण्यात आले.


शिबिरामध्ये 40 ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला,15 व्यक्तींना चष्मे वाटप करण्यात आले न. तर गावातील 5 व्यक्तींना मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे.
या वेळी डॉक्टर श्री सोमनाथ बोराटे टेंभुर्णी यांनी गरजू व्यक्तींना अतिशय छान माहिती सांगीतली. त्याबद्दल उपस्थित ग्रामस्तामधून समाधान व्यक्त करण्यात आले.
या शिबिरामध्ये उपस्थित राहून डोळे तपासणी व योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल श्री नाथराव रंदवे उपसरपंच सरपडोह यांनी डॉ सोमनाथ बोराटे साहेब व श्री दिपक काकडे आणि उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले.

या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक भाऊसाहेब, पोलीस पाटिल, माजी सरपंच, सोसायटी चेअरमन, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here