माढासोलापूर जिल्हा

संत माळी आप्पा यांच्या 121 व्या पुण्यतिथीनिमित्त तुळशी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

संत माळी आप्पा यांच्या 121 व्या पुण्यतिथीनिमित्त तुळशी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न

उपळवटे (प्रतिनिधी संदीप घोरपडे) : माढा तालुक्यातील तुळशी येथे सालाबाद प्रमाणे यावर्षी ही संत माळी आप्पा यांच्या 121 व्या पुण्यतिथीनिमित्त तुळशी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न झालेला आहे या सप्ताहाची सुरुवात दिं 31/5/2022 रोजी झाली असून 7/6/2022 रोजी हा सोहळा संपन्न झाला आहे.

रोजचे दैनंदिन कार्यक्रम पहाटेची 4 ते 6 या वेळात काकड आरती व भजन सकाळी 7 ते 9.30 ज्ञानेश्वरी पारायण सकाळी 10 ते 12.30 गाथा भजन माळी आप्पा भजनी मंडळ तुळशी यांच्याकडून मंदिरामध्ये घेतले जातात दुपारी 2 ते 4 महिला भजनी मंडळ 4 ते 6 या वेळात संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र 6 ते 7 हरिपाठ 7 ते 8 भावार्थरामायण रात्री 9 ते 11 हरिकीर्तन व हरिजागर असे कार्यक्रम संत माळी आप्पा मंदिरामध्ये घेतले जातात.

वीणा व कलश पूजन हरिभक्त परायण गोपाळ काका कुलकर्णी यांच्या हस्ते झाले आहे मंगळवार हरिभक्त परायण अर्जुन महाराज देशमुख तुळशी यांचे कीर्तन बुधवार हरिभक्त परायण अभिमन्यू महाराज घाडगे खुनेश्वर यांचे कीर्तन गुरुवार हरिभक्त परायण नवनाथ महाराज साठे ढगपिंपरी यांची कीर्तन शुक्रवार हरिभक्त परायण भगवंत महाराज चव्हाण माळखांबी यांचे कीर्तन शनिवार हरिभक्त परायण परमेश्वर महाराज केरूरकर अ.नगर यांचे कीर्तन रविवारी हरिभक्त परायण एकनाथ महाराज हांडे पंढरपूर यांचे कीर्तन.सोमवार हरिभक्त परायण मोहन महाराज बेलापुरकर पंढरपूर यांचे कीर्तन हरिभक्त परायण सायंकाळी 7 ते 9 या वेळात मोहन महाराज बेलापूरकर यांचे काल्याचे किर्तन झालेले आहे अशा पद्धतीने हा सोहळा पार पडला.

सकाळी दिंडी नंत्तर हरिभक्त परायण बालाजी महाराज शिरसट मसले चौधरी यांचा भारुडाचा कार्यक्रम पार पडला असून त्यांना मृदंगाचार्य विठ्ठल वाघमारे पंढरपूर ज्ञानदीप टोनपे केम किर्तन साथ हरिभक्त परायण तुकाराम बुवा रोकडे सोलापूर यांनी दिली आहे.ह्या सोहळ्याची परंपरा 186 वर्षापासून चालत आली असल्याची माहिती तानाजी होनमाने यांनी दिली आहे या सप्ताहाचे नियोजन संत माळी आप्पा भजनी मंडळ तुळशी व गावकरी यांनी केले आहे या सोहळ्यासाठी महाप्रसादाची व्यवस्था तानाजी राजाराम होनमाने उत्तम चौधरी गुरुजी सतीश ढेरे गुरुजी सोमनाथ हाडपे गुरुजी यांनी केली होती.

हेही वाचा – कर्मकांड सोडून संत तुकाराम महाराज व आऊसाहेब जिजाऊंना वंदन करून उंदरगावच्या निकत परिवाराचा पुण्यात अनोखा वास्तुशांती व गृहप्रवेश

चिंच, आवळा, जांभळं हा रानमेवा होतोय दुर्मिळ; आजकालची बच्चेकंपनी चॉकलेटवरच..

या कार्यक्रमासाठी उपस्थित संत माळी आप्पा भजनी मंडळ पद्माकर घाडगे युवराज घाडगे सुरेश माळी दिगंबर माळी मुरलीधर घाडगे निवृत्ती माळी सुरेश रेताळ सुभाष घाडगे महादेव घाडगे दिगंबर निमगिरे मनोज शहा सर्व भजनी मंडळ तुळशी व गावकरी मंडळी उपस्थित होते.

litsbros

Comment here