करमाळासोलापूर जिल्हा

धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरेच्या भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरेच्या भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

करमाळा(प्रतिनिधी); गौंडरे येथील युवक सुरज सुभाष हनपुडे हा भारतीय सैन्य दलात भरती झाला असुन बेळगाव येथील एक वर्षाचे ट्रेनिंग संपवून उत्तराखंड येथे देशसेवेसाठी रुजु होत आहे.

निस्सीम देशभक्ती मनात असलेल्या सुरज ने खडतर परिस्थितीत यश संपादन केल्याने धर्मवीर संभाजी विद्यालाच्या वतीने आज सत्कार आयोजित करण्यात आला होता.

या वेळी संस्थेचे सचिव हरिदास काळे म्हणाले की सुरज ने सैन्यात भरती होवुन देशसेवा करण्याचा घेतलेला निर्णय सर्व ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद असुन आम्हाला सुरज चा अभिमान आहे.

तर माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष उत्तमराव हनपुडे सर यांनी सुरज याचे कौतुक करताना सुरज हनपुडे यांनी पंचक्रोशीतील युवकां पुढे आदर्श निर्माण केला असून सुरज यांच्याकडुन युवकांनी प्रेरणा घेवुन या भागातून सैन्यात भरती होणारी संख्या वाढवावी असे आवाहन केले.

तर शिवप्रताप युवा प्रतिष्ठानचे फरतडे म्हणाले की, आज सैनिक सिमेवर बाजी लावुन लढत असल्यानेच आपण घरी कुटुंबा समवेत शांत झोपु शकत आहोत.

अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य असलेल्या सैनिकांप्रती व त्यांच्या कुटुंबियां प्रती आदर ठेवणे आपले कर्तव्य असल्याचे सांगत सैन्यात शौर्य गाजवण्यासाठी जवान सुरज हनपुडे यांना शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना सुरज हनपुडे म्हाणले की आज विद्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कारामुळे भारवलो असुन आपल्या शाळेचे ,गुरुजनांचे,गावाचे,काळ्या मातीचे ॠण फेडण्यासाठीच सैन्यात भरती झालो असुन युवकांनी सैन्य भरती साठी पुढे येण्याचे आवाहन केले .

हेही वाचा-थकीत वीज बिल भरा व माफी मिळवा

लॉकडाऊन काळात चोरून दारु विकणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील 13 दारु दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द ; ‘या’ सामाजिक कार्यकर्त्याने केली होती तक्रार

या वेळी मुख्याध्यापक बापु निळ, सहशिक्षक उत्तम हनपुडे, हरिदास काळे,यशवंत कोळेकर,वैजीनाथ भोईटे,इंद्रजित मुळिक,सुखदेव गिलबिले,संतोष पुराणे,अशोक जावळे,
कर्माचारी व्हि .डी निळ ,बापु तांबोळी,श्रीकांत नलबे,प्रकाश साळवे,श्रिमती सुवर्णा नलबे व विद्यार्थी उपस्थित होते.

litsbros

Comment here