****** भाषण अन संभाषण *****
त्याचं काय झालं आपली बघा पूर्वीची एक म्हण होती बोलणाऱ्याची माती खपती अन घुम्या घरी गहू घेऊन येतोय म्हणजे भाषण किंवा बोलणं एक विशिष्ट लकब असते ती प्रत्येकाला जमलच असं नाही तो एक पिंड म्हणलं तरी चालेल मग त्याने कोणत्याही विषयावर व प्रसंगी काहीही भाष्य केलं तर ते प्रभावी ठरतं आता तसं बघायला गेलं तर भाषण आणि संभाषण ही सख्खी भावंड फरक फक्त एवढाच की एकाला फक्त एकटाच बस होतो पण दुसऱ्याला दोन-चार जण बरोबर असल्याशिवाय जमत नाही आणि रंगत पण येत नाही.
पण एक मात्र खरं आहे प्रत्येकाची बोलण्याची एक ढब असते कुणी आवेशात बोलतो तर कोणी संयम पाळून बोलतो कुणी आपल्याच मूळ शैलीत अनुसरून बोलतो तर कोणी असं बोलतो की त्याच्या प्रत्येक वाक्याला नाही तर प्रत्येक शब्दाला टाळ्या असतात कारण तसं पाहायला गेलं तर भाषण एक शास्त्रशुद्ध कला आहे तर ती बोलणारा वक्ता ऐकणारा श्रोता आणि आस्वाद न घेता नुसतच बघणारा प्रेक्षक तिघांचा एक सुंदर मिलाप असतो भाषण करताना शब्दांमध्ये रंजकता आणून समर्पक शब्दांनी श्रोत्यांना खेळवून ठेवणे श्रोत्यांच्या भावनेत वाहून न जाता अलिप्त राहणे सातत्याने भानावर राहणे गरजेचे असते नाहीतर जीभ घसरली या मथळ्याखाली जनतेची माफी मागावी लागते प्रसंगी मोर्चा दंगल प्रक्षोभक वातावरण निषेध इत्यादी कारवायांना सामोरे जावं लागतं आणि बोलणं पण असं असावं नेमकं कुठं व काय बोलावं ते पण योग्य आणि मार्मिक असावं तर त्यात मजा आहे आता काय झाले कारण भाषण म्हणजे सादरीकरण आलं त्याचेही काही नियम आहेत.
आता बघा उगाच संधी मिळाली म्हणून भाषणाच्या नावाखाली काय पण बराळायची काही लोकांना घाण सवय असते प्रसंगावधान राखणे हा अतिशय महत्त्वाचा गुण वक्त्यामध्ये असावा लागतो उदाहरणार्थ समजा पाऊस आल्यावर थोडीशी चलबिचल होते पण अशा अवस्थेत लोकांना मैदान न सोडण्यासाठी भावनिक आवाहन करणे चालू सभेत काही कारणास्तव गोंधळ झाल्यास श्रोत्यांना शांत राहण्यास सांगून पुन्हा आपल्या विषयाजवळ आणणे ही एक कला असावी श्रोत्यांना जिंकायचं असतं जो वक्ता पहिल्या पाच मिनिटात सभा ताब्यात घेतो तो अर्धी लढाई जिंकतो भाषण संपू नये असं वाटत असतानाच आपण ते संपवू शकतो तेव्हा मात्र टाळ्यांचा गजर होतो वक्त्याजवळ अजून एक महत्त्वाचा गुण असावा लागतो तो म्हणजे हजर जबाबीपणा काही वेळेस श्रोते चावटपणा म्हणून चालू भाषणामध्ये शेरेबाजी करून ओरडून व्यत्यय आणतात थोडा गोंधळ होतो तो शेर याच्या विरोधात असतो भाषा शैली सुद्धा प्रखर असते तेव्हा तो वक्ता त्या शेराला हात वर करून वाहवा म्हणून दाद देतो टाळ्या वाजवतो क्षणात वातावरण बदलतं त्याचा मोठेपणा दिसतो व शेर मारणारा तिथून काढता पाय येतो आता भाषण म्हणजे योगायोगाने जनसमुदाय ताब्यात ठेवणे पण संभाषण ही एक कला आहे कारण विशिष्ट संभाषणामधून चांगले चांगले निर्णय बाहेर पडतात उदाहरणार्थ मंत्रिमंडळाची बैठक असते तेव्हा एकमेकांशी होणारे संभाषण चांगले निर्णय घेऊ शकतात
पण काही वेळा मी पाहिले मी जेथे काम करीत होतो तेथे स्टाफ क्वार्टर मिळण्यासाठी काही कामगार नेते लवकर क्वार्टर मिळावे म्हणून आग्रही होते ही होतं त्यांच्यात मेन सेक्रेटरी पण ह्याला काय आग्या ना पिच्छा असं काही बी धोरण नव्हतं पाण्याचा अंदाज न घेता डोहात उडी टाकायची आणि गटकाळ्या खायच्या आता बघा दोन दिवसात सर्व स्टाफला कॉर्टर मिळणार होते पण ह्यो दिड शहाणा मीटिंगमध्ये म्हणाला 28 तारखेपर्यंत क्वार्टर नाही मिळाली तर आम्ही निदर्शनं करू साहेब दोन दिवसात क्वार्टर देणार होता ह्याची 28 तारीख जवळ जवळ 23 दिवस पुढं होती त्याला एवढं समजत नव्हतं की पहिली बोलणी काय झालेली आहे कार्यवाही कुठपर्यंत आलेली आहेत झालं उद्या मिळणारं क्वार्टर साहेब पण जरा सरकलेलाच होता बरोबर 28 तारखेला क्वार्टर अलॉटमेंटचं लेटर दिलं हे असलं संभाषण काय कामाचं आता भाषणाची पण तीच गत सगळा कामगार वर्ग पाचवी सातवी शिकलेला म्हणजे साधारणतः अशिक्षित वर्गात मोडणारा अंग मेहनती काम करणारा त्याचं काय झालं शाळेवर एवढं काय कुणाचं लक्ष नसायचं अन तवा शिकवलेला इतिहास आता काय लक्षात राहतोय होय दुपारी एक ते दीड जेवायची सुट्टी असायची तेव्हा ही लोकं कामगार सभा घ्यायची कसं तरी घाईत खाऊन आलेली किंवा जाऊन आता खायचयं ती काढता पाय घ्यायची का तर कामगारांच्या मागणी पुरतं बोलायचं तर ही सांगायचं स्वातंत्र्यापूर्वी आपल्यावर असंच पोर्तुगीजांनी राज्य केलं आता ह्यातल्या निम्म्या लोकांनी पोर्तुगीज हा शब्दच पहिल्यांदा ऐकलेला होता हळूहळू एक एक जण सटकायला लागला होता.
आता भाषण म्हटले की कुठून एवढा ह्यांना उत्साह आणि जोर येतो पार माईकच्या वायरी तुटूस्तवर आणि भोंगे बंद पडुस्तवर बोलणारे वक्ते पण मी पाहिलेत परत भाषण करताना प्रसंगाची जाणीव पाहिजे एक जण मेलं होतं तेव्हा गल्लीतल्या चार दोन भुरट्यांनी वर्गणी काढली माईक सिस्टीम आणली का तर श्रद्धांजली वाहण्यासाठी असंच आणलं एक जण धरून वक्ता म्हणून त्याला झाला गर्व अन त्याला भाषण करायचं म्हणल्यावर लॉटरी लागल्या वाणी झालं आपण एक सेलिब्रेटी आहोत असंचं त्याला वाटायला लागलं घरी गेलं चांगली टकाटक मध्ये दाढी कटिंग केली इस्त्री चे कपडे घातले आता ह्याला एवढी अक्कल पाहिजे आपण कोणत्या कार्यक्रमासाठी चाललोयं पण ही पण तसलच होतं ह्यांनी पण थोडी लावलेली होती हा अन जी मेलेलं होतं ती पण कायम नशेतच असायचं कुणाला उपद्रव नाही आपल्याच तंद्रीत ह्याच्या घरी पाहुणा जरी गेला तरी दुसरा दिवस सोडून तिसऱ्या दिवशी विचारायचं कवा आला आता याच्यापुढे काय डोकं फोडून घ्यावं का म्हणजे समाजाला याच्यापासून फायदा पण नाही आणि तसं पाहिलं तर तोटा पण नाही पण ही भाषण करणारं जी होतं ती म्हणतयं कसं अंकुशराव गेले त्यांच्या जाण्यानं समाजाची अपरिमित हानी झाली ही पोकळी कधीच भरून येणार नाही यातलं काय पण त्याला लागू पडत नव्हतं असंच असतंय माहीत नसताना मनानेच बोलायचं नसतं आणि भाषा करताना उगाच आपलं भाषण दर्जेदार दर्जेदार व्हावं म्हणून बुलंद तोफ तरुणांच्या गळ्यातला ताईत उमलतं नेतृत्व भावी आमदार कुठून शब्द आणत्यात त्यांनाच माहीत पण ही विशेषणं आणि तो माणूस यांचा एकदम 36 चा आकडा काही पण केलं तरी यांचा काही मेळ बसत नाही तर अशी भाषणं शक्यतो टाळावीत बरं का…
**************************************
किरण बेंद्रे
पुणे…… दि…07/9/2022
7218439002
Comment here