साहेब झालात.. सामाजिक बांधिलकी व सेवावृत्ती भाव कायम जपा, न्यायाच्या बाजूने भक्कम उभे रहा; जेऊर येथे यशवंत विद्यार्थ्यांना DYSP अजित पाटील यांचा सल्ला

साहेब झालात.. सामाजिक बांधिलकी व सेवावृत्ती भाव कायम जपा, न्यायाच्या बाजूने भक्कम उभे रहा; जेऊर येथे यशवंत विद्यार्थ्यांना DYSP अजित पाटील यांचा सल्ला

करमाळा (प्रतिनिधी);
सामाजिक बांधिलकी व सेवावृत्ती भाव कायम जपा, न्यायाच्या बाजूने भक्कमपणे उभे रहा असा मौलिक सल्ला डिवाय एसपी अजित पाटील यांनी जेऊर ता करमाळा येथील आयोजित कार्यक्रमात यशवंत युवा यूवतींना दिला. भारत महाविद्यालय व आ नारायण पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील लोकसेवाa आयोगाच्या परीक्षेत यशप्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नारायण पाटील होते.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण महर्षी प्रा जयप्रकाश बिले, आदिनाथचे माजी संचालक धूळा कोकरे, नवनाथ झोळ, सभापती अतुल पाटील, उपसभापती गणेश चौधरी व दत्ता सरडे, माजी सभापती शेखर गाडे व गहिनीनाथ ननवरे, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिलकुमार गादीया, सचीव प्रा अर्जून सरक, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ अनंतराव शिंगाडे, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज प्राचार्य केशव दहिभाते, संस्था सदस्य पाथ्रुडकर काका, सुनील बादल, मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हा सचीव नीळ सर, आबासाहेब गोडसे, राहूल गोडगे, सरपंच भारत साळवे आदि उपस्थित होते. यावेळी डिवाय एसपी मा श्री अजित पाटील (केंद्रीय गृहमंत्री पदक विजेते पोलिस अधिकारी) यांच्या हस्ते सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.

आय ए एस अधिकारी कु. शुभांगी पोटे (शेलगाव-वांगी) , आय एफ एस अधिकारी तुषार शिंदे (कंदर),एसटीओ ज्ञानेश्वरी गोडसे (जेऊर) पी एस आय अमित लबडे (शेटफळ), पी एस आय निखील सरडे (चिखलठाण), पी एस आय सागर पवार (सरफडोह), पी एस आय श्रीकांत गोडगे (पुर्व सोगाव), पी एस आय ओंकार धेंडे (जिंती), पी एस आय दत्तात्रय मिसाळ (कोर्टी), पी एस आय अभिजित ढेरे (वीट), सोनाली हनपुडे (गौंडरे), पी एस आय विद्या कळसे (गुळसडी), पी एस आय पल्लवी मारकड (उमरड) या यशवंत विद्यार्थ्यांचे सत्कार संपन्न झाले. यासह त्यांच्या पालकांचे सत्कारही करण्यात आले.यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की राज्याच्या प्रशासनाला चांगल्या अधिकार्‍यांची गरज आहे.

समाजातील तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी या नूतन अधिकार्‍यांनी विशेष लक्ष द्यावे. ग्रामीण भागातील ही शेतकरी व सर्वसामान्य कुटूंबातील मुले व खास करुन मुले आता प्रशासनात उच्च पदावर येत असल्याने निश्चितच ग्रामीण भागातील समस्या सुटण्यास वेग येईल.

हेही वाचा – डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची करमाळा तालुका कार्यकारिणी जाहीर

गणेश चिवटे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; करमाळा तालुक्यातील ‘हे’ प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन

चांगल्या लोकहिताच्या कामापाठीमागे व लोकहित जपणाऱ्या युवा अधिकार्‍यांच्या पाठीशी आपण कायम उभे राहू असे आश्वासन पाटील यांनी दिले. सैराटफेम अभिनेते व नामांकित व्याख्याते प्रा डाॅ संजय चौधरी यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचे स्वागत भारत महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ अनंतराव शिंगाडे यांनी केले.

सूत्रसंचालन सहशिक्षक अंगद पठाडे यांनी केले तर भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जून सरक यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला इयत्ता दहाविच्या विद्यार्थ्यांना विशेष निमंत्रित केले गेले. तसेच पालकांसह जेऊर व परिसरातील युवकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line