Uncategorized

दुर्दैवी: मेंढ्यांना धुवायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुर्दैवी: मेंढ्यांना धुवायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

करंजी तालुक्यातील पाथर्डी येथे धक्कादायक घटना घडली आहे. बोरुडे तलावात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने  एकच खळबळ उडाली आहे. संदीप अकोलकर (२९) आणि बापू अकोलकर (२७) अशी मृतांची नावं आहेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डी येथे नेण्यात आले आहेत. दरम्यान, या दुर्देवी घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.


संदीप आणि बापू हे दोघे सख्ख्ये भाऊ त्यांच्या शेतात असलेल्या तलावाजवळ मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी ते तलावाजवळ गेले असता संदीपचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्यानंतर संदीपला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ बापूने त्याला हात दिला. मात्र, दोघांचाही तोल गेल्याने ते पाण्यात पडले. पोहता येत नसल्याने या दोघा भावांचा तलावात बुडून मृत्यू झाला.


त्यानंतर ही घटना संदीपची पत्नी सोनालीनं पाहिली. सोनालीने आरडाओरडा केल्यानंतर नामदेव अकोलकर, दादा मुखेकर यांनी घटनास्थळी धाव घेत या दोघा भावांना पाण्यातून बाहेर काढले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दरम्यान, दोघाही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डी येथे नेण्यात आले आहेत.

litsbros

Comment here