पंढरपूरसोलापूर जिल्हा

दुर्दैवी: पेपर लिहताना विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुर्दैवी: पेपर लिहताना विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू 

पंढरपूर शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वर्गात पेपर लिहित असताना एका तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आज (19 जानेवारी) सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनन्या भादुले असे (वय 9 वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. अरिहंत इंग्लिश स्कूल मध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनन्या ही तिसरीत शिकत होती. नेहमीप्रमाणे आज सकाळी शाळेत गेली होती.

अनन्याचा शाळेत पेपर होता. वर्गात गेल्यानंतर तिने शिक्षकांसोबत गोड गप्पा देखील मारल्या. दरम्यान, पेपर लिहत असताना तिची अचानक तब्येत बिघडली. शिक्षकांनी तिला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.


भर वर्गात अनन्याचा मृत्यू झाल्याने शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अनन्याच्या जाण्याने तिच्या कुटु्ंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनन्या ही दोन दिवसांपासून आजारी होती. मात्र, पेपर असल्याने पालकांनी तिला शाळेत सोडले असल्याची माहिती मिळत आहे.

litsbros

Comment here