क्राइम

लग्नाला 10 वर्ष होऊनही मूल झालं नाही म्हणून पती- पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

लग्नाला 10 वर्ष होऊनही मूल झालं नाही म्हणून पती- पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल

आजच्या  काळात विज्ञान बरंच पुढे गेलं आहे. विज्ञानाच्या मदतीने अनेक गोष्टी शक्य होतात आणि अडचणीही दूर करता येतात. मात्र, याच विज्ञानाच्या काळात साताऱ्यातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात आई-बाप न होता आल्याच्या दुःखात एका दाम्प्त्याने थेट टोकाचं पाऊल उचललं. साताऱ्यातून ही अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.


यात एका दाम्प्त्याने मूल होत नसल्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील वाई तालुक्यातील कणूर गावात घडली आहे. तानाजी राजपुरे आणि पत्नी पुजा राजपुरे अशी मृतांची नावं आहेत. या दोघांचा 10 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, 10 वर्षांच्या त्यांच्या संसाराचा अतिशय हृदयद्रावक अंत झाला आहे.


लग्नाला दहा वर्ष होऊनही मूल होत नसल्याने दोघंही चिंतेत होते. मूल होत नसल्याने वैद्यकीय उपचारही सुरू होते. मात्र, त्यालाही यश आलं नाही. अखेर या दुःखातून त्यांनी हे पाऊल उचललं. दोघांनीही राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


तानाजी राजपुरे आणि त्यांची पत्नी पुजा हे दोघंही अनेक दिवसांपासून मूल व्हावं यासाठी प्रयत्न करत होते. वैद्यकीय उपचारांनाही यश न आल्याने दोघंही खचले. तानाजी हे शेतकरी कुटुंबातील होते. अखेर लग्नानंतर 10 वर्षांनी दोघांनीही टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

litsbros

Comment here