ताज्या घडामोडीदेश/विदेश

ब्रेकिंग! हेलिकॉप्टर अपघातात भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत यांचे निधन; कोण होते रावत.? वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ब्रेकिंग! हेलिकॉप्टर अपघातात भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत यांचे निधन; कोण होते रावत.? वाचा सविस्तर

भारतासाठी एक दु:खद माहिती समोर आली असून हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे.

सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे एकूण 14 जण होते अशी माहिती मिळते आहे.

कोण होते बिपीन रावत?

2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक झाली होती.

बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली. बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल. एस. रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले.

रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले ‘बेस्ट कॅडेट’ होते.

रावत यांचा ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ या पुरस्कारानेही सन्मानित त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे.

करमाळा तालुक्यातील ‘या’ गाव सीमेवर नागरिकांना दिसला बिबट्या; वनविभाग पिंजरा कधी लावणार ?

घरातील व्यक्तीच्या निधनानंतर पॅन कार्ड आधार कार्डचे काय करावे? वाचा, नाहीतर होईल मोठे नुकसान

litsbros

Comment here