दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एकाचा मृत्यू, कुर्डूवाडीतील दुर्दैवी घटना
कुर्डुवाडी/प्रतिनिधी ( राहुल धोका)
माजी सभापती शिलाताई रजपूत यांच्या पतींचे आनंद रजपुत यांचे निधन.
कुर्डूवाडी येथिल बॅंक ॲाफ बडोदाचे सेवानिवृत्त अधिकारी आनंद शिवमुर्ती रजपूत यांचे अपघाती निधन झाले ते ६७ वर्षांचे होते.
नित्य दिनक्रमानुसार सायंकाळी फिरण्यास गेले असता परांडा रोड वरील घरकुल वसाहती जवळ त्यांना एका दुचाकीस्वाराने जोरात धडक दिल्याने त्याच्या डोक्यास जोराचा मार लागला बार्शी येथील भगवंत मल्टीस्पेशालिटी हॅास्पिटल मधे दाखल केले असता सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
ते बॅंक कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष होते तसेच कु्र्डूवाडी येथील डॅा बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,,दोन मुले, दोन सुना तीन भाऊ, भावजय, पुतणे, पुतण्या तसेच नातवंडे असा परिवार आहे.
ते प्रा डॅा आशिष रजपूत यांचे वडील तर माढा तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती शिलाताई रजपूत यांचे पती होते.
Comment here