क्राइमदेश/विदेश

गैरमार्गाने श्रीमंत झालेल्या जगातील सेलिब्रिटीच्या यादीत ‘या’ भारतरत्नाचे नाव; राजकीय खळबळ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गैरमार्गाने श्रीमंत झालेल्या जगातील सेलिब्रिटीच्या यादीत ‘या’ भारतरत्नाचे नाव; राजकीय खळबळ

जगभरातील 35 राजकीय नेते आणि 300 हून अधिक सेलेब्रिटींनी आपल्या आर्थिक व्यवहारासाठी बनावट ऑफशोअर कंपन्या स्थापन केल्या आहेत असं पँडोरा पेपर्सने म्हटलं आहे.

 

काही वर्षापूर्वी पनामा पेपर्सने बनावट कंपन्यांद्वारे पैशाचा फेरफार करणाऱ्या जगभरातील अनेक मोठ्या लोकांची तसेच भारतीयांची नावं उघड केली होती. त्याचप्रमाणे आता जगभरातील शोधपत्रकारांच्या टीमने, पँडोरा पेपर्सने लाखो कागदपत्रांचा अभ्यास करुन अवैध्य मार्गाने श्रीमंत बनलेल्या अब्जाधीशांची नावं उघड केली आहेत.

या यादीत जगभरातल्या सध्याच्या 35 सत्ताधाऱ्यांची आणि 300 हून अधिक सेलिब्रेटींचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय स्टार खेळाडू सचिन तेंडुलकरच्या नावाचा समावेश असल्याची चर्चा आहे. सचिनच्या नावासोबतच देशातील सहा मोठ्या राजकारण्यांची नावंही या यादीमध्ये असल्याचं सांगण्यात येतंय.

या शोधपत्रकारांच्या एका टीमने 1.19 कोटी कागदपत्रांचा अभ्यास केला असून त्यामधून गुप्त पद्धतीने झालेले आर्थिक व्यवहार उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. या टीममध्ये बीबीसी, द गार्डियन तसेच भारतातील इंडियन एक्सप्रेस या सोबत जगभरातल्या 150 माध्यमांचा समावेश आहे.

ICIJ च्या यादीत भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, पॉप स्टार दिवा शकिरा, सुपरमॉडेल क्लाऊडिया सिफर यांच्यासोबत जगभरातील अनेक स्टार व्यक्तींचा समावेश असल्याचं सांगण्यात येतंय.

हेही वाचा- जातेगाव-करमाळा-टेंभुर्णी रस्ता बनला मृत्यूचा सापळा; वेळीच दुरुस्ती करा अन्यथा होणार ‘अंत्ययात्रा आंदोलन’

..म्हणून काल सोमवारी रात्री साडे सात तास होते व्हाट्सप, फेसबुक व इन्स्टाग्राम बंद; वाचा सविस्तर

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, गैरमार्गाने अब्जावधी संपत्ती कमावल्याचा आरोप झाल्यानंतर सचिन तेंडुलकरच्या वकिलांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. सचिन तेंडुलकरने आपले सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे केले असून सरकारचा टॅक्सही वेळोवेळी भरला आहे असं त्यामध्ये म्हटलं आहे.

पँडोरा पेपर्सने म्हटलं आहे की, जगभरातील मोठ्या सेलेब्रिटींनी आपल्या अवैध्य आर्थिक व्यवहारासाठी बनावट ऑफशोअर कंपन्या स्थापन केल्या आहेत. या कंपन्यांचा वापर बेहिशेबी पैसा लपवणे, कर चुकवणे अशा कारणांसाठी केला गेला.

litsbros

Comment here