रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यावतीने ‘या’ मागण्यांसाठी करमाळा तहसील समोर भव्य निदर्शने
करमाळा(प्रतिनिधी) ; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रामदास आठवले राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर आरपीआय पक्षाच्या वतीने दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोजी करमाळा तहसील समोर नीदर्शनाच्या माध्यमातून जाहीर आंदोलन करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यामध्ये राजाभाऊ सरवदे राज्य सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली व करमाळा तालुक्यामध्ये अर्जुन गाडे यांच्या नेतृत्वामध्ये खालील विषयांवर निदर्शने करण्यात आलेले आहेत.
1) महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा
2) करमाळा तालुक्यातील कुकडी प्रकल्पातील पोंधवडी चारीचे अपुरे काम पूर्ण करण्यात यावे
3) महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार थांबवावे
4) आगामी महानगरपालिका नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग पद्धत रद्द करून वॉर्ड पद्धत करावे
5) ओबीसी समाजाला व मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे
6) ॲट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी करावी अशा अनेक मागण्यांसह 20 ऑक्टोबर 2021 रोजी तहसील येथे निदर्शने करण्यात आले.
या आंदोलनाचे निवेदन करमाळा तहसीलचे तहसीलदार समीर माने यांनी स्वीकारले तर या आंदोलनासाठी तालुकाध्यक्ष अर्जुन गाडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश झेंडे जिल्हा युवा उपाध्यक्ष बाळासाहेब ठाकरे तालुका सरचिटणीस राजेंद्र सरतापे कामगार आघाडी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष यशवंत गायकवाड
नरेंद्र ठाकूर सुभाष देडगे प्रशांत घाडगे दादा गायकवाड बबन सल्ले दादा शेख युसुफ शेख अमोल कदम विठ्ठल कदम शहाजी धेंडे राजेंद्र कांबळे विकास कांबळे आदी पदाधिकारी या आंदोलनासाठी उपस्थित होते.
Comment here