ताज्या घडामोडीदेश/विदेश

रॉयल एनफिल्डच्या Bullet 350 ची ‘सवारी’ करा फक्त १८,००० रुपयांमध्ये; बघा EMI किती?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

रॉयल एनफिल्डच्या Bullet 350 ची ‘सवारी’ करा फक्त १८,००० रुपयांमध्ये; बघा EMI किती?

देशाच्या टू-व्हीलर सेक्टरमध्ये, मायलेज बाईक्सनंतर क्रूझर बाईक सेगमेंटला सर्वाधिक पसंती दिली जाते, ज्यामध्ये प्रामुख्याने रॉयल एनफिल्ड, बजाज आणि जावा सारख्या कंपन्यांच्या बाईक्स आहेत. यातही Royal Enfield Bullet 350 ची अनेक वर्षांपासून वेगळीच क्रेझ राहिलीये. कंपनीची देखील ही सर्वात लोकप्रिय व बेस्ट सेलिंग बाईक आहे.


Royal Enfield Bullet 350 खरेदी करायची असल्यास तुम्हाला त्यासाठी १.३८ लाख ते १.६० लाख रुपये खर्च करावे लागतील. पण, जर तुमचे एवढे मोठे बजेट नसेल, किंवा एकाचवेळी इतके पैसे भरायची तयारी नसेल तर तुम्ही फक्त १८ हजार रुपये डाउनपेमेंट देऊन ही बाईक खरेदी करू शकता. डाउन पेमेंट योजनेबाबत जाणून घेण्याआधी एक नजर मारुया बाईकच्या स्पेसिफिकेशन्स आणि अन्य डिटेल्सवर,


इंजिन specification:

Royal Enfield Bullet 350 मध्ये कंपनीने ३४६ सीसीचं सिंगल सिलेंडर इंजिन दिलं आहे. जे एअर कूल्ड फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १९.३६ पीएस पॉवर आणि २८ एनएम पीक टॉर्क जनरेट करतं. इंजिनसोबत ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. ही बाईक ३५ ते ४०.८ किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. ब्रेकिंगसाठी कंपनीने बाईकच्या फ्रंट व्हीलला डिस्क ब्रेक दिला आहे. तर मागील व्हीलला ड्रम ब्रेक असून त्यासोबत सिंगल चॅनल एबीएस सिस्टिमही आहे.


दरमहा ५,९०१ रुपये EMI-
BIKEDEKHO या टू-व्हीलर सेगमेंटची माहिती देणाऱ्या वेबसाईटवर दिलेल्या डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, Bullet 350 खरेदी करायची असल्यास कंपनीशी संबंधित बँक या बाईकवर १,६४,३०७ रुपये कर्ज देईल. या कर्जाच्या रकमेवर, तुम्हाला १८,२५६ रुपये डाउन पेमेंट करावे लागेल. त्यानंतर दरमहा ५,९०१ रुपये मासिक EMI भरावा लागेल. बुलेट 350 वरील कर्जाचा कालावधी ३६ महिन्यांचा ठेवण्यात आला असून बँक या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.७ टक्के दराने व्याज आकारेल.

litsbros

Comment here