सोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापूर पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला: दरोड्याच्या तयारीतील पाचजणांना अटक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दरोड्याच्या तयारीतील पाचजणांना शहरात अटक सदर बाझर पोलिसांची कारवाई

सोलापूर : सोलापूर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीने ओमिनी कारमधून निघालेल्या पाचजणांना सदर बझार पोलिसांनी नळबझार चौकात जेरबंद केले .आकाश मधुकर दर्जी ( वय लहान इरण्णा वस्ती ) , अक्षय गणेश कलबुर्गी (वय २०,मच्छी गल्ली,बेडर पूल ),रोहन शशिकांत गायकवाड (वय १९रा. लिमयेवाडी),रोहन विजय मैनावाले ( वय २० बेडर पूल लष्कर),विठ्ठल रत्नसिंह फटफटवाले ( वय २९ , रा . सिद्धार्थ चौक बापूजीनगर)अशी अटक करण्यात आलेल्या पाचजणांची नावे आहेत.

शनिवारी रात्री नऊ वाजता सदर बझार पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे फौजदार संजय राठोड यांना एका कारमधून दरोडा टाकण्याच्या तयारीने टोळी निघाल्याची माहिती मिळाली सात रस्ता येथे सापळा लावला.

जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाकडून चौकाकडून त्यानुसार पथकाने सात रस्त्याकडे ओमिनी कार ( एमएच १३ सी ०७३९ ) ही वेगाने निघाल्याचे दिसले.त्यावेळी पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ती न थांबता वेगाने जगदंबा चौकमार्गे नळबझार चौकाकडे गेली.

पोलिसांनी नळबझार चौकातील तपस्या नर्सिंग होमसमोर गाडी थांबवली.त्यावेळी गाडीमध्ये पाच आरोपी व एक अल्पवयीन मुलगा दिसून आला.गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये चार तलवारी, एक मोठा कोयता, धारदार सुरा पाइप ,केबल , मिरची पूड , पेट्रोल बाटली , कारडीपेटी असे दरोडा टाकण्याचे साहित्य आढळून आले.

हेही वाचा- करमाळा; फक्त 2 पॉझिटिव्ह; आज रविवारी 25 जणांना डिस्चार्ज; 139 जणांवर उपचार सुरू

केतूरची लेक प्राचार्या कमलादेवी आवटे यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या उपसंचालक पदी निवड

अटक केलेल्या आरोपींवर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,पोलीस उपायुक्त बापू बांगर,सहायक आयुक्त प्रीती टिपरे पोलीस निरीक्षक बजरंग साळुखे,संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राठोड,कर्मचारी शेख, आरेनवर,जाधव, बडुरे,काळजे, सुरवे यांनी केली.

 

litsbros

Comment here