प्रवासी सेवा संघाकडून विविध मागण्यांचे निवेदन:नव्याने सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यासह इतर मागण्या

प्रवासी सेवा संघाकडून विविध मागण्यांचे निवेदन:नव्याने सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यासह इतर मागण्या

केत्तूर (अभय माने) प्रवासी सेवा संघ सोलापूर यांच्याकडून विभागीय वरीष्ठ वाणिज्य व्यवस्थापक मध्य रेल्वे सोलापूर यांना नुकतीच प्रवाशांच्या विविध मागण्यां व स्टेशन सेवा सुविधेबाबत निवेदन देण्यात आले.

या दिलेल्या निवेदनात नव्याने सुरू झालेल्या दौंड कलबूर्गी दौंड डेमू शटल सेवा कायमस्वरुपी करुन वाशिंबे रेल्वे स्थानकावर थांबा देणे.महापरिनिर्वाण दिन विशेष गाडीस मोहोळ,माढा,केम,जेऊर,पारेवाडी येथे थांबा देणे.जेऊर स्थानकावर सरकता जिना बसवने,सोलापूर दौंड डेमूचा विस्तार हडपसर पर्यंत करणे,सोलापूर हुतात्मा एक्सप्रेसला जेऊर,माढा येथे थांबा देणे,माढा स्टेशन येथील मालवाहतूक सेवा पूर्ववत करणे,जेऊर येथे पार्सल सेवा आँफिस सुरू करणे अशा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

हेही वाचा – शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे हे कर्मवीरांनी ओळखले_डॉ.अभय लुणावत

ग्रामीण भागात पहिल्यांदाच श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजमध्ये एन.एन.एस. या नवीन युनीटचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

यावेळी वरीष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी मागण्यांचे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूरी घेणेबाबत सोलापूर रेल्वे विभागाकडून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line