रेल्वे प्रवाशी संघटनेच्या प्रयत्नांना यश;कोईमतूर – कुर्ला रेल्वे गाडीला जेऊर येथे एका दिवसासाठी थांबा

रेल्वे प्रवाशी संघटनेच्या प्रयत्नांना यश;कोईमतूर – कुर्ला रेल्वे गाडीला जेऊर येथे एका दिवसासाठी  थांबा

 करमाळा (प्रतिनिधी) रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नातून कोईमतूर-कुर्ला रेल्वे गाडीला एक दिवसासाठी जेऊर येथे मिळाला थांबा मिळाला आणी विद्यार्थी, नोकरदार व प्रवाशांची सोय झाली .
जेऊर तालुका करमाळा येथील रेल्वे स्टेशन वरून दररोज पुणे येथे शिक्षण, नोकरी व दैनंदिन कामकाजासाठी हैद्राबाद मुंबई एक्सप्रेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते.

आज 13 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी येणारी ही हैदराबाद मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस उशिराने धावत असल्याने या गाडीने नेहमी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली होती अचानक गाडी लेट असल्याचे कळल्याने पुण्याला परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची फारच गैरसोय होणार होती.

आरोग्य उपचारासाठी पुणे येथे हॉस्पिटल मध्ये अपॉइंटमेंट असणारे काही रुग्ण या गाडीने जाणार होते, अशावेळी जाणाऱ्या प्रवासातील काही प्रवाशांनी जेऊर येथील प्रवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला व ही अडचण त्यांना सांगितली.

प्रवासी संघटनेचे सुहास सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आज एका दिवसासाठी कुर्ला कोईमतुर या गाडीला जेऊर स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली. प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन जेऊर रेल्वे स्टेशन प्रबंधक व प्रशासनाने ही सकारात्मक पाऊल उचलत कुर्ला कोईमतुर गाडीला जेऊर येथे थांबवले.

या काळात सर्व प्रवाशांना या गाडीने प्रवास करणे शक्य झाले याबद्दल प्रवासी संघटनेचे व या कामी सहकार्य करणाऱ्या रेल्वे प्रशासनाचे सर्व प्रवासी व त्यांच्या नातेवाईकांनी आभार मानले.

आज जेऊर स्टेशन वरून काही विद्यार्थी परीक्षेला पुणे येथे चालले होते काही नोकरदार वर्गाला त्यांना कामावर वेळेवर जायचे होते काही प्रवासी दवाखान्यात चालले होते. आशा प्रवाशांना या थांब्यामुळे मोठा दिलासा मिळाला.

हेही वाचा – ऊसबिलासाठी आश्वासने देऊन शेतकऱ्यांचा अंत पाहणाऱ्या मकाई अन बागलांच्या गलथान कारभाराविरोधात पुणे साखर आयुक्त कार्यालय येथे होणार बेमुदत हलगी नाद आंदोलन; वाचा सविस्तर

केत्तूर येथील प्राचीन महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा भाविकांच्या गर्दीत उत्साहात संपन्न

वारंवार अशा अडचणी या स्टेशनवर येत असल्याने हुतात्मा एक्सप्रेस ला कायमस्वरूपी या स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी अनेक दिवसापासून रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने केली जात आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line