पुन्हा अवकाळीची शक्यता: थंडीला ब्रेक

पुन्हा अवकाळीची शक्यता: थंडीला ब्रेक

केत्तूर (अभय माने) संपूर्ण करमाळा तालुक्यासह उजनी लाभक्षेत्र परिसरात गेल्या दोन दिवसापासून थंडीची चाहुल लागताच पुन्हा एकदा वातावरण बदलल्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त होत आहे.

नैऋत्य व लगतच्या पश्चिम बंगालच्या उपसागरात तर तामिळनाडू व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र कायम राहिल्याने हवामान कोरडे कायम आहे. दरम्यान केत्तूर परिसरात गुरुवार (ता.14) सकाळी सातच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा थोडा रिमझिम पाऊस झाला.दिवसभर वातावरण ढगाळ राहिले होते. त्यामुळे थंडी मात्र पुन्हा एकदा गायब झाली व वाढत्या थंडीला ब्रेक बसला आहे. नोव्हेंबर 14 ते 17 दरम्यान वेधशाळाकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या दरम्यान हवामानही ढगाळ राहणार आहे.

हेही वाचा – खतरनाक फ्रॉड..! तुमच्याच बँक खात्यात पैसे पाठवून अशा प्रकारे तुमचीही होऊ शकते फसवणूक!

सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील करमाळा तालुक्यातील डिकसळ चेक पोस्टवर वाहनांची कसून तपासणी

ढगाळ वातावरण तयार झाल्याने भाजीपाला पिकावर रोगराईचे संकट आले आहे तर थंडी गायब झाल्याने रब्बी पिकांना याचा फटका असल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे.

karmalamadhanews24: