रावगांव येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

रावगांव येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

करमाळा (प्रतिनिधी) – रावगांव ता . करमाळा येथे प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला तीन साजरा करण्यात आला यावेळी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, व अहिल्यादेवी होळकर , यांच्या प्रतिमेचे पूजन जि. प . प्रा. शाळेतील शिक्षिका रोहिणी चव्हाण – बरडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे बोलताना म्हणाले की, सामाजिक जीवनात पुरुषा प्रमाणेच महिलाही मोलाचे योगदान देतात परंतु अनेक ठिकाणी पुरुषाप्रमाणेच महिलांना समान अधिकार दिले जात नाही समाजासाठी महिलांनी दिलेले योगदानाचे महत्त्व समजण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना समान अधिकार देण्याच्या उद्देशाने ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो असे कांबळे बोलताना म्हणाले.

हेही वाचा – पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य. प्रदेश उपाध्यक्ष पदी ” नमिता थिटे” यांची पुनश्च एकदा निवड

केत्तूर परिसरातील नागरिकांनी घेतला ” छावा ” या ऐतिहासिक चित्रपटाचा आनंद

यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रियंका कांबळे ,प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या सचिवा सौ .शितल कांबळे,सौ. रोहिणी चव्हाण-बरडे मॅडम, सौ.विद्या गंभीर-शिंदे मॅडम, कु. कोमल काळुंखे मॅडम, सौ .पल्लवी पवार सौ .द्रौपदी जाधव सौ. दिपाली कांबळे सौ .शोभा पवार, आदीसह महिला व पदाधिकारी उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line