करमाळासोलापूर जिल्हा

रावगाव येथील प्रतिष्ठान च्या वतीने भीमजयंती निमित्त ‘एक वही-एक पेन’ अभियान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

रावगाव येथील प्रतिष्ठान च्या वतीने भीमजयंती निमित्त ‘एक वही-एक पेन’ अभियान

करमाळा(प्रतिनिधी) ; भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक वही एक पेन अभियान प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान च्या वतीने राबविण्यात येणार आहे.

हे अभियान जयंतीदिनी रावगाव ता. करमाळा या ठिकाणी राबवण्यात येणार असल्याचे प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामदास कांबळे यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आदर्श घेत प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान करमाळा शहर व तालुक्यात गेली तीन वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम करीत आहे प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले जातात वेळोवेळी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते.

हेही वाचा – ‘करमाळा चषक’ क्रिकेट स्पर्धेत दहिगाव संघाने मारली बाजी; सिद्धार्थ स्पोर्टसचा मिलिंद दामोदरे मालिकावीर

करमाळा तालुक्यातील ‘या’ 6 गावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकांचे वाजले बिगूल; गावागावात गटातटाला आला उत

जयंतीच्या निमित्ताने हार फुलांवरती जास्तीत जास्त खर्च करण्यापेक्षा प्रत्येकाने एक वही व एक पेन अर्पण करावे जमा झालेले शैक्षणिक साहित्य करमाळा शहर व तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल असे अवाहान प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामदास कांबळे यांनी केले आहे.

litsbros

Comment here