करमाळा तालुक्यातील रावगाव येथील कोविड सेंटरचे पारनेरचे आ.निलेश लंके यांच्या हस्ते उद्घाटन
करमाळा(प्रतिनिधी) ; रावगावचे सुपुत्र उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे ,पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे ,पोलीस निरीक्षक महेश पाटील ,आणि निलेश बुधवंत यांच्या संकल्पनेतुन गावातील तरुण , व्यापारी , प्रतिष्ठित ग्रामस्थ यांनी लोकवर्गणीतून तयार केलेल्या रावगाव तालुका करमाळा येथील कोविड सेंटरचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी भेट देऊन त्यांनी पाहणी केली व या कोविड सेंटरसाठी लागेल ती मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले.
प्रशासकीय अधिकारी आपल्या गावाला एका माळेत बांधण्याचे काम करू शकतात हे त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रावगाव येथील तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मेसेज पासून सुरुवात होऊन एकत्र येऊन जमेल तशी मदत करून लोकसहभागातून कोविड सेंटर उभा करून सिद्ध केले आहे, त्यासाठी लागणारे बेड , लागणारे साहित्य ,औषधे ,नाष्टा ,तसेच पैशाच्या स्वरूपात ग्रामस्थांनी देणगी दिली .
या सेंटर मध्ये ५० रुग्णाची सोय करण्यात येणार आहे. या ठिकाणी आपण रूग्णांना थंड,गरम पाणी , दैनंदिन गरजेच्या वस्तु ,औषधे ,मास्क ,सँँनेटायझर , रुग्णाची अद्ययावत माहिती ,नाष्टा ,चहा ,जेवन आदी सोय केली जाणार आहे.
हेही वाचा-करमाळा शहरात विनाकारण मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची तपासणी करा
याप्रसंगी रावगावचे सरपंच दादा जाधव , प्रशांत शिंदे ,भास्कर पवार , जि.प सदस्य संतोष वारे ,करमाळा शहराध्यक्ष अभिषेक आव्हाड ,संदिप शेळके ,अनिल पवार,बलभिम शिंदे ,संदिप पवार,दत्ता बरडे,डॉ. बुधवंत , ग्रामविकास अधिकारी हजारे भाऊसाहेब ,तलाठी राऊत भाऊसाहेब ,शशिकांत केकान ,अशोक बरडे सर ,माधव फुंदे सर ,पवन पवार ,आकाश पवार ,विनोद बरडे ,अनिस शेख ,प्रविण जाधव,बप्पा शिंदे , मधुकर पवार , आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Comment here