करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
खाऊच्या पैशाचे आमिष दाखवत बोगस डॉक्टरने केला बलात्कार, सोलापूर जिल्ह्यातील घटना
पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील एका बोगस डॉक्टरने अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना ही मंगळवेढा तालुक्यातील सलगर येथे घडली असून या प्रकरणी आरोपी डॉक्टर हरी पत्की रा.सलगर याला मंगळवेढा पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर पत्की याने एका ९ वर्षीय शाळकरी मुलीला खाऊसाठी पैशाचे आमिष दाखवून वाईट उद्देशाने दवाखान्यात नेले आणि दवाखान्यामध्ये त्या मुलीवर बळजबरी लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात आरोपी डॉक्टर हरी पत्की याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मंगळवेढा पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे.
Comment here