रानमेवा ही झाला लॉक
केतूर (अभय माने) उन्हाळा हंगामात आंबट गोड चवीची करवंदे (काळी मैना) तसेच आंबट-तुरट जांभूळ बाजारात दाखल होते सर्वजण आवडीने त्याची चव आवर्जुन चाखत असतात मात्र गतर्षीप्रमाणे याहीवर्षी हा रानमेवा अद्याप बाजारात दाखल झालेला नाही. सध्याही कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हा रानमेवा जणूकाही ” लॉक ” झाल्याने खवय्यांची मात्र पंचायत झाली आहे.
हेही वाचा-जेऊर येथे ‘शिव- भिम- मुस्लिम समिती’ च्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न
हृदयद्रावक घटना, एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याचं कळताच आईनेही सोडले प्राण
यावर्षी मे महिना सुरू झाला असलातरी करवंदाची तसेच जांभळाची चव उद्यापर्यंत चाखायला मिळाली नाही.यावर्षीही आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारा रानमेवा ही लॉक झाला आहे असेच सध्या तरी चित्र असून यावर्षी हा रानमेवा खावयास मिळणार नाही असेच दिसत आहे.
Comment here