महाराष्ट्रराज्यशैक्षणिक

राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार;मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार;मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा असुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्यानुसार आता राज्यभरातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेली आहे.

बहुतांश ठिकाणी शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात येणार आहे. तर, शाळा कुठल्या वर्गांची व कशा पद्धतीने, कोणत्या वेळेत सुरू होतील? याबाबतची सविस्तर माहिती समोर आलेली नाही.

शाळा सुरू करण्यापूर्वी याआधी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची तयारी शिक्षण विभागला करावी लागणार आहे.शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे, शाळा सॅनिटाइज करणे, शाळेत आरोग्य कक्ष तयार ठेवणे अशी तयारी पूर्ण करायची आहे.

हेही वाचा-‘इथे म्हैस का चारतो.?’ म्हणून तिघांची एकास मारहाण; करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

ऊस वाहतूकदारांचे प्रश्न तात्काळ निकाली काढा; जनशक्ती चे महाराष्ट्र राज्य साखर संघ व वेस्ट इंडियन शुगर मिल्स ला दिले निवेदन

टास्क फोर्स किंवा राज्य सरकारच्या शाळा सुरू करण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचना या जिल्हास्तरावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पाळायच्या आहेत.
स्थानिक कोरोना परिस्थितीचा विचार करून त्यानुसार शाळा सुरू करण्याबाबतचा नियोजन जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या आदेशानुसार होईल.शिक्षण विभागाने लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकांचा डेटा मागवला असून शाळा सुरू करण्याबाबतची तयारी सुरू ठेवली आहे.

litsbros

Comment here