करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

राज्यातील मुस्लिम समाजाला आरक्षण द्या; हाजी उस्मानशेठ तांबोळी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राज्यातील मुस्लिम समाजाला आरक्षण द्या; हाजी उस्मानशेठ तांबोळी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

करमाळा:- प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाला शिक्षण व नौकरीत आरक्षण द्यावे अशी मागणी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे ईमेल द्वारे केली आहे

यावेळी दिलेल्या ईमेल् मध्ये म्हटले आहे की .महाराष्ट्रात मुस्लिम समाजाचे जवळपास 15 ते 16 टक्के लोकसंख्या असुन महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यामध्ये मुस्लिम समाजाची सध्याची आर्थिक. शैक्षणिक व राजकीय परिस्थिती अत्यंत दयनीय अवस्थेत आहे हे केंद्र व राज्यामधील विविध आयोगाने दाखवुन दिलेले आहे आपल्या देशामध्ये अनेक वर्षांपासून मुस्लिम समाज इतर समाजाबरोबर सरळ व अभिमानाने आपले जीवन जगत आलेला आहे.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सुध्दा मुस्लिम समाजाचा सिंहाचा वाटा आहे अनेक लोकांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतु स्वातंत्र्यानंतर देशात आलेले प्रत्येक सरकारने या समाजाच्या प्रगती कडे लक्ष दिले नाही यामुळे मुस्लिम समाज आज स्वत:चे अस्तित्व सुरक्षितता प्रगती या मुद्द्यावर सतत झुंजत आहे.

मुस्लिम समाज आजही मोठ्या प्रमाणात प्रगती पासून वंचित आहे याचे मोठे कारण म्हणजे समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात आहे इतर समाजाच्या तुलनेत शैक्षणिक प्रगतीची टक्केवारी अत्यंत कमी प्रमाणात आहे यामुळे मुस्लिम समाजाचे शैक्षणिक आर्थिक मागासपणा दुर करण्यासाठी समाजाच्या मागणी नुसार आघाडी सरकारने डाॅक्टर महमुद रहेमान समितीच्या शिफारशीनुसार शिक्षणामध्ये तसेच शासकीय निमशासकीय सरळ सेवा भरती मध्ये 5 % आरक्षण देण्यात यावे.

यापूर्वी आघाडी सरकारने 5% आरक्षण दिले होते परंतु या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यास विधानसभेत ठराविक वेळेत विधेयक मांडणे गरजेचे असताना त्या वेळी पुढील आलेल्या फडणवीस सरकारने हे विधेयक विधानसभेत जाणीवपूर्वक आणले नाही तसेच प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम मुला मुलींसाठी वस्तीगृह काढणे बार्डी आणि सारथी च्या धर्तीवर मुस्लिम मुला मुलींसाठी युपीएससी व एमपीएस सी साठी संस्था स्थापन करण्यात यावे.

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ निधीत वाढ करण्यात यावी व राज्यामधील वकफ मंडळाची बळकटी करण्यात यावी आता महाराष्ट्रात तीन पक्षाचे महाआघाडीचे सरकार आहे या तिन्ही पक्षाच्या मुस्लिम मंत्री पदाधिकारी व प्रमुखांनीआपण मुस्लिम समाजाचे काही तरी देणेकरी आहोत यासाठी मुस्लिम आरक्षणासाठी पाठपुरावा करावा.

हेही वाचा-वडाची फांदी तोडून नाही, तर वडाचे रोप लावून करा वटपौर्णिमा साजरी; करमाळा नगरपालिकेला ‘या’ नंबर फोटो पाठवून मिळवा प्रमाणपत्र व जिंका बक्षिस

जागतिक योग दिनानिमित्त करमाळा शहर भाजपच्यावतीने उद्या ‘या’ ठिकाणी योगा आणि प्राणायम शिबिर चे आयोजन

महाराष्ट्रातील मुस्लिम समाजास शिक्षण व नौकरी मध्ये पाच टक्के आरक्षण मिळवून दयावे यावे व महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम नागरिकांनी राज्याच्या मुख्यमंत्री ना आरक्षणा संदर्भात प्रत्येकी एक पत्र पाठवावे अशी मागणी तांबोळी यांनी केली आहे

 

litsbros

Comment here