महाराष्ट्र

‘या’ १४ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा; ९ ऑगस्टपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

‘या’ १४ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा; ९ ऑगस्टपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

राज्यातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांत 9 ऑगस्टपर्यंत हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या भागांत अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, उर्वरित भागातही मुसळधार पाऊस पडणार आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व आणि उत्तर पश्चिम भागात 7 ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे.

यामुळे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. सध्या बंगालच्या उपसागरापासून ते आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या भागात द्रोणीय स्थिती तयार झाली होती. त्यामुळे राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे.

 

कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने या भागाकडून राज्याकडे बाष्प वाहू लागले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे. तर उर्वरित भागातही मुसळधार पाऊस पडणार आहे.

6 ते 9 ऑगस्ट या भागांत ऑरेंज अलर्ट

कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, पुणे (घाटमाथा), सातारा, औरंगाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया

 

litsbros

Comment here