ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावधान..! पुढच्या 48 तासांत पुन्हा अतिवृष्टी! पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला झोडपणार पाऊस

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सावधान..! पुढच्या 48 तासांत पुन्हा अतिवृष्टी! पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला झोडपणार पाऊस

 

पुणे : पुढील 48 तासांत पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात पुढील 48 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. याबरोबरच मुंबईतदेखील मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 16 जुलैपासून काही ठिकाणी पाऊस ओसरण्याचीदेखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभाग अधिकारी अनुपम कश्यपी यांनी राज्यातील सध्याच्या पावसाच्या स्थितीची माहिती दिली. मागील सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अद्याप उसंत घेतलेली नाही. त्यातच हवामान विभागाने पुन्हा अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता आहे. यादरम्यान नागरिकांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.


पुणे शहर, जिल्हा तसेच घाट माथ्याचा परिसर हा रेड अलर्टमध्ये आहे. त्यामुळे घाटमाथ्याच्या ठिकाणी पुढील काही दिवस जाऊ नये. शहर परिसराला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये वाहतुकीचा प्रश्न त्याचबरोबर रस्त्याकडेची झाडे कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. खोलगट परिसरात पाणी साचण्याच्या घटना घडणार आहेत. वाहने चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे अनुपम कश्यपी यांनी सांगितले.


आताची परिस्थिती पुढील 48 तासांत हा मुसळधार पाऊस पुण्यासह मुंबई आणि घाटमाथ्यावर होणार आहे. 15 तारखेला पाऊस कमी होईल. तर त्यानंतर म्हणजेच 16 जुलैपासून वातावरणात पुन्हा बदल होऊन पावसाची परिस्थिती निर्माण होईल. मध्यम ते मुसळधार असा हा पाऊस असेल. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक या चार ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असे अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

कोकण, गोवा, पालघर, रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचे ते म्हणाले. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रवास करणे टाळावे. विशेषत: घाट माथ्याच्या परिसरातून प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

litsbros

Comment here