बळीराजाला दिलासा; महिनाभराच्या विश्रांतीनंतर करमाळा तालुक्याला पावसाने झोडपले; वाचा सविस्तर
केतुर (अभय माने) करमाळा तालुक्यातील ग्रामीण परिसरात मंगळवार (ता. 22) रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले.
या अगोदर परिसरात ता.31 मे च्या मध्यरात्री दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर महिनाभराच्या विश्रांतीनंतर रिमझिम पावसानंतर आज हा जोरदार पाऊस झाला आहे.
नागरिक, शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते परंतु पाऊस मात्र गुंगारा देत होता त्यामुळे चिंता वाढली होती.या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला.
आज सकाळपासूनच काळे कुट्ट ढग भरून आले होते परंतु पावसाने मात्र पाचच्या दरम्यान सुरुवात केली हा पाऊस परिसरातील केतुर, पारेवाडी ,वाशिंबे, सोगाव, उमरड पोफळज, पोमलवाडी, रामवाडी, टाकळी, कात्रज परिसरात झाला आहे.आता नवीन ऊस लागवडीला वेग येणार आहे.एकंदरच शेतकरी मात्र या पावसाने आनंदित झाला आहे.
Comment here