** रेल्वे स्टेशन वर दीड तास **

** रेल्वे स्टेशन वर दीड तास **

तसं बघायला गेलं तर लई दिवसाची गोष्ट नाही हे चार सहा महिने झाले असतील माझ्या मुलाच्या सासरवाडी कडचे लोक कर्नाटक हून रायचूर हून आमचे कडे गणेशोत्सव व गौरीच्या सणासाठी आमच्या आग्रहाला मान देऊन येत होते त्यासाठी मी व माझा मुलगा पुणे स्टेशनवर त्यांना आणायला गेलो होतो बाहेर पार्किंग मध्ये आमची फोर व्हीलर पार्क करून ठेवली होती त्यामुळे मनावरचा ताण कमी झालेला होता साधारण आम्ही दोघांनी पण प्लॅटफॉर्म चं तिकीट काढून प्लेटफार्म नंबर 3 वर पोचलो साधारण दीड तास तेथे गाडी येईपर्यंत थांबावे लागणार होते त्या दीड तासातली हवा
कारण काय तर आम्ही ठरल्यावेळी गेलो होतो पण त्या आनाउन्सर बाईंनी माईकवरुन सांगितलं की शोलापूर से आने वाली उद्यान एक्सप्रेस देढ घंटा देरी से चल रही है त्यामुळं नाईलाज झाला होता तसं पाहिलं तर प्लॅटफॉर्म माणसांनी नुसता फुलून गेलेला होता गर्दीला ऊत आलेला होता कमी होतं नव्हती मिनिटामिनिटाला पाच-पंचवीस माणसांची भर पडत होती त्या गर्दीत गरीब-श्रीमंत..मध्यम… सर्व थरातील लोक होते त्यांचे कपडेच बोलत होते त्याच्यामध्ये रंग उडालेली… रंगीबेरंगी..भळकट… जिर्ण…लाजेपूरते.. तसेच झकपक… सूटबूट टायवाले…पण होते सप्तरंगी तरूणपण सळसळत होते तसेच वार्धक्याच्या जाळ्यात सापडलेले मोहरे पण डोळे टिपत होती.

काही निरागस बालकं आणि उगीचच केसांवरून कंगवा फिरवणारे पण नुसतं माणसांचं म्युझियम…सगळे जण कुठेतरी प्रवास करीत होते कुणी मामाच्या गावाला…कोणी कामाला…कोणी माहेरवाशिन.. कोणी नोकरीच्या शोधात…कोणी औषध पाण्याला…तर कुणी हवापालटं करायला…एकाच्या डोळ्यात पाणी तर दुसऱ्याच्या ओठातं गाणी अशा अफाट गर्दी मध्ये तीळ ठेवायला पण जागा नाही अशा गर्दीत चाय चाय गरम वडा असा गलका करत फिरणारी वेंडर मंडळी पेपर स्टॉलवर आंबट शौकीन उगीचच पुस्तकाची न्याहाळणी करायचे कोणी त्या वजन काट्यावर चढून आदमास घ्यायचा पण त्यांना कुठे माहित होतं तो वजन काटा + — दहा पंधरा किलो असतोय पण तेवढेच मनाचं समाधान मशीन बंद आहे हे वाचून पण पुन्हा पुन्हा मशीनवर उभा राहणारे पण आहेत खरंतर टॉयलेटमध्ये असणारे व तिथेच इंडिया टुडे वाचणारे दिसतात तसं पाहिलं तर खरा इंडिया टुडे बाहेर आल्यावर दिसणारच आहे अशात कोणती तरी एक गाडी कर्कश आवाजाचा हॉर्न वाजवत येत होती प्लॅटफॉर्मवर मोठं लट अडकवलेलं व बंद पडलेलं घड्याळ बघून आपल्या हातातल्या घड्याळाचा टाईम बघून खात्री करायची पण एकदाची ही अठरापगड जातीच्या लोकांना पोटात घेऊन येणारी आगीनगाडी एकदाची प्लॅटफॉर्मवर येते माणसं कुठून येतात कुठे जातात काही बी माहिती नसते पण योग्य गाडी येईपर्यंत थांबतात आणि तो प्लॅटफॉर्म आणि हा थांबण्याचा थोडासा काळ म्हणजेच जीवन
कारण रेल्वे स्टेशन आणि गर्दीने फुलून गेलेला प्लाटफार्म ही खूप व्यस्त आणि उत्तेजित करणारी जागा आहे हो वरील सर्व मी ऐकून होतो पण पाहुण्याला आणायला गेल्यावर मला खरा अनुभव आला जसं काय कान आणि डोळा यात चार बोटाचे अंतर आहे तो दीड तास दहा मिनिटा सारखा गेला कारण वेळेला पण पंख असतात आलेला अनुभव माझ्यासाठी रोमँटिक होता त्याच प्लॅटफॉर्मवर हमाल.. फेरीवाले…रेल्वेचे गार्ड…टी सी… मेकॅनिक.. भिकारी… इत्यादींचा अद्भूत मेळा भरलेला होता मी मात्र मजेत याचा आनंद लुटत होतो प्लेटफार्म खच्चून भरलेला होता ठीक ठिकाणी बॅगा…सुटकेस…टोपले… पाकीटं… खेळणी…पाण्याच्या बाटल्या…ठेवलेल्या होत्या.

एखादं पोरगं काहीतरी घ्यायसाठी त्याचं रडगाणं चालू होतं पण ती काय म्हणतयं काय मागतयं ही त्या कालव्यात समजत नव्हतं म्हणून त्याची आई एखादा धपाटा लावत होती तर दुसरं आईच्या मांडीवर बसून त्याला बघून रडत होतं जवा एखादी गाडी प्लॅटफॉर्मवर यायची तेव्हा सगळी गर्दी तिच्यावर झडप घालायची ती थांबायच्या आधीच तिला लोंबकाळायचे व जागा पकडायला पळापळी करायचे काही हमाल तर चालत्या गाडीतच प्रवाशांना सामानासकट चढवून देण्यात गर्क होते काही म्हातारे व बायका-माणसं व मुलं यांना गाडीत चढणे मुश्कील झालं होतं कुठल्यातरी गाडीच्या ड्रायव्हरने व गार्डने शिट्टी मारल्यावर हिरवा झेंडा दाखवायचा आटोकाट प्रयत्न केला कारण गाडीला सिग्नल अगोदरच मिळालेला होता क्वचित एखादा टी सी विदाऊट प्रवाशांना पकडून घेऊन जाताना दिसत होता जाणाऱ्या इंजिनाचा जोराचा आवाज हे फेरीवाल्याचं ओरडून विकणं खराब किंवा कोमट चहा दिल्यामुळं प्रवाशांची चहा वाल्या बरोबरची हुज्जत कारण त्यांना माहित असतयं की ही गिऱ्हाईक काय परत येणार नाही पान चघळणारे कोणी जमिनीवर पथारी पसरून आराम करणारे हा देखावा फक्त प्लॅटफॉर्मवरच पाहायला मिळतो काही कामगार घाण साफ करीत होते तर काही घाण करीत होते नळावर जसं काय मोफत दूध वाटप केंद्रावर व्हावी त्याची गर्दी झालेली होती रंगीबेरंगी कपडे घातलेले वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक पाहून विविधता आणि विशालता याची एक झलक पाहायला मिळते गाडी हलल्यावर ते केलेलं हस्तांदोलन किंवा डोळ्यांच्या वल्ल्या झालेल्या कडा बघून आपल्याला पण गहिवरून येतं एक खेड्याचा नवरदेव नवरीच्या ओढीनं लग्नाला चाललेला होता त्यानं पानाचा तोबरा भरलेला होता मधेच एखादा पोलीस खिसे कापुला धरून मारीत होता चोराची होत असलेली पिटाई बघून लोक खूष झाली होती तेवढ्यात पाहुण्याला घेऊन येणारी उद्यान एक्सप्रेस धापा टाकीत तीन नंबर प्लॅटफॉर्म वर थांबली त्या गर्दीतून नेमका आपला पाव्हणा हुडकून काढायचा म्हणजे पायलीभर तांदळातला एखादा खडा निवडायचा असं झालं होतं त्याच्याजवळ सामान काही जास्त नव्हतं फक्त दोन सुटकेस व एका गोणीत उसाच्या कांड्या व हरभऱ्याचा डहाळा गावातल्या शेतातून आणलेला घरी येताना असं वाटलं कि स्टेशनवर चा एक दीड तासाचा सहवास आपल्या खिशात कायम आठवणीत राहील
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!किरण बेंद्रे
पुणे
7218439002

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line