धार्मिकमहाराष्ट्र

ब्रेकिंग; संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा, ‘या’ तारखेला पुन्हा होणार ‘मराठा मोर्चा’

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ब्रेकिंग; संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा, ‘या’ तारखेला पुन्हा होणार ‘मराठा मोर्चा’

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्त आज रायगडावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केले.या कार्यक्रमानंतर शिवभक्तांशी संवाद साधताना छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.

मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकारला ६ जूनपर्यंत अल्टिमेटम देणाऱ्या खासदार संभाजीराजे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.

येत्या १६ जूनला कोल्हापुरात आंदोलनाची सुरूवात होणार असून मराठा समाजाचा पहिला मोर्चा शाहू महाराजांच्या समाधीपासून निघेल.


मी राजकारणी नाही. राजकारण करत नाही. समाजावार अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे.
एवढे दिवस तुम्ही माझा संयम पाहिला, पण आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका खासदार संभाजीराजे यांनी रायगडावरून मांडली.

हेही वाचा-राज्य सरकारकडून ‘कोरोनामुक्त गावांसाठी’ स्पर्धेची घोषणा;’किती’ रूपयांचे आहे स्पर्धेतील पहिलं बक्षीस:वाचा- सविस्तर

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत घेतलेल्या स्पर्धेत करमाळा नगरपरीषदेचा जिल्हा व राज्यात झेंडा; क्लिक करून वाचा कितवा क्रमांक आला.?

दरम्यान, एवढेच नाही तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार. पुण्यापासून ते मुंबईपर्यंत मराठा समाज लाँग मार्च काढणार असा इशारा देखील संभाजीराजेंनी रायगडावरून दिला.

litsbros

Comment here