क्राइमपुणे

धक्कादायक: मित्राचा खून करून घरामागे पुरले

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक! मित्राचा खून करून घरामागे पुरले

 

पुणे – मित्राचा खून करून घरातील मोकळ्या जागेत त्याचा मृतदेह पोत्यात घालून पुरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कात्रज परिसरात शुक्रवारी दुपारी मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. पूर्ववैमनस्यातून मित्रांनीच त्याचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
किरण शिवाजी डोळे (रा. दुगड चाळ, आयप्पा मंदिराजवळ, कात्रज) असे मयत व्यक्तीने नाव आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, फरार झालेल्या संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किरण डोळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी किरण हा ओमकार जोरी या मित्राकडे जातो, असे सांगून घरातून गेला. मात्र, त्यानंतर घरी परतला नाही.

त्यामुळे त्याच्या पत्नीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तो मिसिंग झाल्याची तक्रार दिली होती.
किरण राहात असलेल्या भागात त्याचा मित्र ओमकार जोरी हा त्यांच्या आजीकडे राहात होता. किरण बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी आजीसह जोरी बंधू अचानक निघून गेले. त्यामुळे किरण याच्या कुटुंबीयांचा त्याच्यावर संशय बळावला होता.

ते सर्व लोणावळा जवळील मळवली येथील नातेवाईकांकडे रहावयास गेले होते. तेथे आजीने त्यांच्या नातेवाईकांना कात्रजमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. नातेवाईकांनी त्याची माहिती लोणावळा पोलिसांना दिली. खुनाचा प्रकार असल्याने भारती विद्यापीठ पोलिसांना लोणावळा पोलिसांनी गुरुवारी रात्री खबर देताच तपासाला सुरुवात झाली.


पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ निरीक्षक वसंत कुंवर, विष्णू ताम्हाणे, गुन्हे तपास पथकाचे महेंद्र पाटील आदींच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. शुक्रवारी दुपारी जोरी याच्या घराजवळ मोकळ्या जागेत खोदले असता किरण याचा पोत्यात बांधलेला मृतदेह आढळून आला. सडलेल्या अवस्थेतील मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आले आहेत.

litsbros

Comment here