पुण्यात जुनी पेंशन हक्क अधिवेशनाचे आयोजन; बाबा आढाव, आ रोहित पवार यांच्यासह अनेक दिग्गज राहणार उपस्थित

पुण्यात जुनी पेंशन हक्क अधिवेशनाचे आयोजन; बाबा आढाव, आ रोहित पवार यांच्यासह अनेक दिग्गज राहणार उपस्थित

पुणे(प्रतिनिधी); राज्यसह देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर 2005 च्या आधी प्रमाणे जुनी पेन्शनच मिळावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने सबंध देशभर व राज्यात मागील दहा वर्षापासून विविध स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने उपोषणे धरणे आंदोलने केली जात आहेत. त्यातीलच एक टप्पा म्हणून जुनी पेन्शन हक्क संघटनच्या वतीने फुलेवाडा गंजपेठ पुणे येथे जुनी पेन्शन हक्क अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती संघटन नेते शहाजी गोरवे यांनी दिली.

या अधिवेशनाला ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव हे उद्घाटक म्हणून उपस्थित असणार आहेत. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व आमदार रोहित पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत भाऊ तुपकर, काँग्रेस आमदार रवींद्र भाऊ धंगेकर, भाजपचे आमदार राहुल दादा कुल, राष्ट्रवादीचे आमदार अशोक बापू पवार तसेच हेही यावेळी विशेष उपस्थित राहणार आहेत. हे अधिवेशन गंजपेठेतील फुलेवाडा येथील सावित्रीबाई फुले सभागृहात रविवारी १७ सप्टेंबर रोजी दहा ते पाच या वेळेत संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला पुणे जिल्हा व महाराष्ट्रातून अधिकाधिक डीसीपीएस धारकांनी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष सागर शिंदे यांनी केले आहे.

तर यावेळी प्रमुख अतिथी मा. आ. कुमार सप्तर्षी (अध्यक्ष म. गांधी स्मारक समिती ), मा. आ. बाळाराम पाटील (मा. विधानपरिषद सदस्य, रायगड मतदार संघ ), मा., प्रशांतदादा जगताप (मा.महापौर पुणे), मा. विजय कुंभार (उपाध्यक्ष आम आदमी पार्टी म. राज्य), ॲड. भूषण राऊत, (जेष्ठ विधीज्ञ मुंबई उच्च न्यायालय), मा. आ. दत्तात्रय सावंत (मा. विधानपरिषद सदस्य, शिक्षक मतदार संघ पुणे) , मा. सुभाष वारे
(कार्याध्यक्ष, सामाजिक कृतज्ञता निधी ), यांच्यासह राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे राज्याध्यक्ष व प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line