क्राइमपुणे

धक्कादायक! लग्नास नकार दिल्याने युवतीचा चिरला गळा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक! लग्नास नकार दिल्याने युवतीचा चिरला गळा

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या दौंड तालुक्यातील मळद (ता. दौंड) गावच्या हद्दीतील एका ऊसाच्या शेतात मंगळवार ५ जून रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केले. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली. सुदैवाने ही तरुणी बचावली आहे. तरुणीने लग्नास नकार दिल्याने हा हल्ला केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पिरंगुट (ता. मुळशी) येथील औद्योगिक वसाहतीतील कुकर हँडल कंपनीतील कामगार राहुल श्रीशैल निरजे (वय २७, मूळ गाव रा. पंचवर्णवाडी खटाव, ता. मिरज, जि. सांगली) याने ससाणेनगर हडपसर येथील एका खासगी शाळेत बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय तरुणीला दुचाकी (एमएच १० डीएस २७१०)ने पुणे-सोलापूर महामार्गावरून मळद येथे आणले. या तरुणीला महामार्गालगतच्या उसाच्या शेतात नेऊन तिच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केले.

या हल्ल्यात चेहरा व गळ्यावर वार झाल्याने तरुणी रक्तबंबाळ झाली होती. ही घटना काही तरुण व ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर त्यांनी हल्ला केलेल्या राहुल निरजे या तरुणाला पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस हवालदार श्रीरंग शिंदे, शंकर वाघमारे, पोलिस मित्र सुनील भंडलकर, राजू भिसे यांनी या कामी मदत केली. जखमी तरुणीला उपचारासाठी दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

litsbros

Comment here