क्राइमपुणे

हडपसर येथील हॉटेल गारवा मालकाच्या खुन कटात तलवारी लपवणारी ‘ती’ १९ वर्षीय मुलगी पोलिसांच्या ताब्यात

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

हडपसर येथील हॉटेल गारवा मालकाच्या खुन कटात तलवारी लपवणारी ‘ती’ १९ वर्षीय मुलगी पोलिसांच्या ताब्यात

पुणे(प्रतिनिधी) ; हडपसर येथील या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. हॉटेल व्यवसायातील स्पर्धेतून गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचा खून केल्या प्रकरणात तलवार घरात लपवून ठेवल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी एका 19 वर्षीय तरूणीस अटक केली आहे. तलवार घरात लपवून आरोपींना मदत केल्याने तिला अटक करण्यात आली आहे.

‘काजल’ (वय 19) असे कोठडी सुनावलेल्या महिलेचे नाव आहे. या गुन्ह्यात यापूर्वी बाळासाहेब खेडेकर (वय ५६), निखिल खेडेकर (वय २४), सौरभ ऊर्फ चिम्या चौधरी (वय २१), अक्षय दाभाडे (वय २७) करण खडसे (वय २१), प्रथमेश कोलते (वय २३), गणेश माने (वय २०), निखिल चौधरी (वय २०, सर्व रा. हवेली) आणि नीलेश आरते (वय २३) यांना अटक झाली आहे. तसेच एका १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. उरुळी कांचन परिसरात १८ जुलै रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास आखाडे यांचा खून करण्यात आला होता.

नीलेश याने त्याचा ओळखीच्या अल्पवयीन मित्रास बोलावून घेत इतर साथीदारांच्या मदतीने आखाडे याचा तलवारीने वार करून खून केला आणि दोघे पसार झाले असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले.
त्यानुसार पोलिसांनी नीलेश आरते आणि त्याचा अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले.

नीलेश याच्याकडे तपास केला असता त्याने आणि अल्पवयीन मुलाने गुन्ह्यांत वापरलेल्या दोन तलवारी लपविण्यासाठी पोत्यात गुंडाळून ‘काजल’ हिच्याकडे १८ जुलै रोजी दिल्याची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा- सुपारी देऊन बापाने केला पोटच्या पोराचा गेम; पाच जणांना ठोकल्या बेड्या; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

करमाळा तालुक्यातील कोळगावची अल्पवयीन तरुणी ऑनलाईन प्रेमात तरुणाच्या भेटीला पोहोचली भुसावळला आणि मग..

पोलिसांनी बिबवेवाडी येथील घरी जाऊन काजलकडे तलवारीबाबत विचारणा केली असता तीने उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता कपाटाच्या मागे पोत्यात गुंडाळून ठेवलेल्या दोन तलवारी पोलिसांना मिळून आल्या.

त्यावर लालसर रंगाचे रक्ताचे डाग आढळून आले.
ते गुन्ह्यांत वापरले असल्याची शक्यता असल्याने तलवारी जप्त केल्या आहेत.
काजल हीने गुन्ह्यांत वापरलेल्या तलवारी लपविण्यास आरोपींना मदत केल्याप्रकरणी तीला अटक केली.

पाच तलवारी व कोयते घेतले बनवून :

नीलेश याच्या तडीपार कालावधीत तो पत्नी काजलसह लातूर जिल्ह्यातील मुळगाव बलसुर येथे राहत असताना ५ तलवारी कोयते बनवून घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

त्यापैकी फक्त २ तलवारी हस्तगत केल्या असून इतर 3 तलवारीचा शोध घेणे,
जप्त केलेल्या तलवारी आणखी दुस-‍या गुन्ह्यात वापरल्या आहेत का? याचा तपास करायचा आहे.
त्यामुळे तिला ५ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सहायक सरकारी वकील नितीन कोंगे यांनी केली.
न्यायालयाने तिला 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.


लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी गुन्हयाचा तपास करीत आहेत.

litsbros

Comment here