क्राइमपुणेमहाराष्ट्र

चाकूनं वार करत पतीने केला पत्नीचा खून, निर्दयी पतीला  पोलिसांनी केली अटक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

चाकूनं वार करत पतीने केला पत्नीचा खून, निर्दयी पतीला  पोलिसांनी केली अटक

 पती मारहाण करतो, अशी सासूकडे तक्रार केल्याने पतीने पत्नीचा खून केला आहे. साडेसतरानळी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पती दारूच्या नशेत पट्ट्याने मारतो, अशी तक्रार सासूकडे केल्याच्या रागातून ही घटना घडली. पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार करून तिचा खून केला. यावेळी मध्यस्ती करणाऱ्या मेव्हणीवरदेखील वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न झाला.

याप्रकरणी पत्नीचा खून करणाऱ्या पतीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. हनुमंत धोंडिबा पवार (वय 22, रा. सूर्यवंशी बिल्डिंग, तोरडमल वस्ती, साडेसतरानळी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. नंदिनी हनुमंत पवार (वय 19) यांही हत्या करण्यात आली आहे. तर मेव्हणी कोमल वैजनाथ लांडगे (वय 22, रा. सूर्यवंशी बिल्डिंग, तोरडमल वस्ती, साडेसतरानळी) यांच्यावर वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला.

याप्रकरणी नंदिनी यांच्या आई माणिक शिवाजी कांबळे (वय 55, रा. सूर्यवंशी बिल्डिंग, तोरडमल वस्ती, साडेसतरानळी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदिनी आणि हनुमंत यांना सहा महिन्यांची मुलगी आहे. या मुलीला सांभाळण्यासाठी नंदिनी यांची आई त्यांच्यासोबत राहतात. मोठी मेव्हणीही राहण्यास तेथेच आहे. हनुमंत बिगारी काम करतो. त्याला दारूचे व्यसनदेखील आहे. घरात नेहमीच वाद होत होते. दारू प्यायल्यानंतर तो पत्नीला मारहाण करत असायचा. घटनेच्या दिवशी हनुमंत याने नंदिनी यांना पट्ट्याने मारहाण केली होती. हा प्रकार त्यांनी आपल्या आईला सांगितला.

हनुमंत याला पत्नी नंदिनीचा राग आला. या रागातून दारूच्या नशेत हनुमंतने हे सर्व आईला का सांगत आहेस, तुला आता सोडतच नाही, असे म्हणत पत्नीच्या छातीवर, पोटावर वार चाकूने सपासप करून तिचा खून केला. याच दरम्यान बहिणीला वाचविण्यासाठी गेलेल्या कोमल यांच्यावरही हनुमंतने वार करून जखमी केले.आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ पडवळकर करीत आहेत.

litsbros

Comment here