* *केत्तूरच्या निकेश खाटमोडे यांची भारतीय पोलीस सेवेत पोलीस उपाधीक्षक म्हणून पदोन्नती*
केत्तूर (अभय माने) महाराष्ट्र पोलीस सेवेत अप्पर पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज, कोल्हापूर) येथे सध्या कार्यरत असणारे केत्तूर (ता.करमाळा) चे रहिवाशी निकेश प्रकाश खाटमोडे पाटील यांची नुकतीच पदोन्नती होऊन त्यांची भारतीय पोलीस सेवेत पोलीस उपअधीक्षक पदी (आयपीएस पदी) पदोन्नती झाली आहे.
हेही वाचा – वीट ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री हेमंत आवटे यांची बिनविरोध निवड
उमरडचे प्रा.नंदकिशोर वलटे यांना शहीद मेजर अमोल निलंगे समाजभूषण पुरस्कार प्रदान
निकेश खाटमोडे पाटील यांनी यापूर्वी सांगली, अकोला , बुलढाणा, औरंगाबाद येथे कार्यभार सांभाळा होता तर काही दिवस ते मुंबई एटीएस (दहशतवाद विरोधी पथक) मध्ये कार्यरत होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतीय पोलीस सेवेत पदोन्नती मिळाली आहे.करमाळा तालुक्यातील भारतीय पोलीस सेवेत पदोन्नती मिळालेले ते पहिलेच पोलीस अधिकारी ठरले आहेत.2006 मध्ये त्यांची निवड झाली होती
त्यांच्या पदोन्नती बद्दल बातमी समजतात केत्तूर येथे फटाके फोडून आतषबाजी करण्यात येऊन जल्लोष व आनंद साजरा करण्यात आला.