प्रा.राहुलकुमार चव्हाण जगदीशब्दाच्या राज्यस्तरीय क्रांतीसुर्य पुरस्काराने सन्मानित.

प्रा.राहुलकुमार चव्हाण जगदीशब्दाच्या राज्यस्तरीय क्रांतीसुर्य पुरस्काराने सन्मानित.

करमाळा प्रतिनिधी –
कोर्टी ता.करमाळा येथील सध्या पुणे येथे कार्यरत प्रा. राहुल कुमार चव्हाण यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकतेच जगदीशब्द फाउंडेशन च्या वतीने दिले जाणारा राज्यस्तरीय क्रांतीसुर्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचे आरोग्यदूत मा.मंगेश चिवटे,जगदीशब्दचे संस्थापक व जग बदलणारा बाप माणूस या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक,व्याख्याते मा. जगदीश ओहळ,यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


पुणे येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ पुणे या ठिकाणी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विचारपीठावर विचारवंत माजी आयपीएस अधिकारी मा. सुरेश खोपडे, विचारवंत व अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य मा. नितीन तळपाडे उपस्थित होते.

हेही वाचा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर करमाळ्यात आले होते, त्या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी करमाळा शहरात विशेष कार्यक्रम आयोजित करणार: मंगेश चिवटे

पद्मश्री आनंद कुमार यांनी केला प्रा. गणेश करे पाटील यांच्या कार्याचा गौरव

अतिशय देखण्या समारंभामध्ये सामाजिक शैक्षणिक क्रीडा राजकीय व कलाक्षेत्रातील विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता योजना चे माजी कक्ष प्रमुख व आरोग्य दूत मा.मंगेश चिवटे यांनी यावेळेस वाचन संस्कृती जोपासली गेली पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करमाळ्यात दिलेल्या क्रांतिकारी भेटीचा उल्लेख करत हा दिवस क्रांती दिवस म्हणून करमाळा येथे साजरा करण्याचे आवाहन केले.
व्याख्याते व जगदीश शब्दाचे सर्वेसर्वा मा. जगदीश ओहोळ यांनी
यावेळी पुणे बुक फेस्टिवल मधील वायरल वाचक स्वच्छता कर्मचारी कृती मोहिते हिचाही विशेष सन्मान करण्यात करून जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाची ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती करन्यात आली.

karmalamadhanews24: