करमाळासोलापूर जिल्हा

प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान च्या वतीने रावगांव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान च्या वतीने रावगांव येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

करमाळा (प्रतिनिधी) – रावगांव ता .करमाळा येथे प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय (प्रिन्स) बागल यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी बागल बोलताना म्हणाले की अण्णाभाऊ चे कार्य खूप महान आहे अण्णाभाऊंनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये अन्याय, अत्याचार, जुलूम, याला वाचा फोडणारी साहित्य निर्मिती केली तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णाभाऊ अग्रेसर होते एवढ्यावरच न थांबता अण्णाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा पोवाडा रशियामध्ये गाऊन शिवाजी महाराजांचे कार्य सातासमुद्रापार नेण्याचे कार्य केले यावेळी जनतेचे नगरसेवक जय कुमार कांबळे उपस्थित होते.

कांबळे बोलताना म्हणाले की अण्णाभाऊ चे कार्य विशाल आहे अण्णाभाऊ चे कार्य आमच्यासारख्या कार्यकर्त्याना सदैव प्रेरणा देत राहील यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी केले.

हेही वाचा-बार्शी तालुक्यात राष्ट्रवादीचे संघटन वाढविणार; बार्शी येथील सत्काराला उत्तर देताना निरीक्षक अभिषेक आव्हाड यांचे प्रतिपादन

दिलासादायक बातमी:महाराष्ट्रातील खासगी शाळांच्या फीमध्ये होणार मोठी कपात

यावेळी सरपंच दादासाहेब जाधव , मा. ग्रा.पं. सदस्य अविदा( ताई )कांबळे ,ग्रा पं सदस्य अनिल पवार ग्रां.प.सदस्य,काकासाहेब पवार मा. उपसरपंच. राजु पवार सरचिटणीस, सागर ओहोळ कार्यकारिणी सदस्य, गणेश पवार कार्यकारीणी सदस्य, लक्ष्मण पवार,मनोज पवार, पवन पवार, दादा पवार, विनोद बरडे, सुखदेव पवार, विशाललोंढे सुभाष बुधवंत, भास्कर भाऊ पवार, शशिकांत केकान, डॉ. राहुल जाधव, शहाजी सुरवसे, भरत धगाटे, रवी मोडके, पोपट बुधवंत, हबीब शेख, गणेश पवार, दादा लोंढे, संस्थेचे अध्यक्ष रामदास कांबळे यांनी आभार मानले .

litsbros

Comment here